Pages

Saturday, 2 February 2013

Happy Valentine Day


Happy Valentine Day

हाय माझ्या तरुण मित्र मैत्रिणिनो .....
कसे आहात ? नवीन वर्षाचे केलेले संकल्प सुरळीत आहेत ना ? कि संकल्पाचीच सुरळी करून त्याची पिंपाणी वाजवत आहात ?
असो उत्तर काही असू द्या निराश होऊ नका .कारण पुन्हा लवकरच नवीन संकल्प सोडण्याची वेळ अगदी तुमच्या कॉलेज ,ऑफिस ,बस स्टोप ,कॉफी शॉप ,हॉटेल्स ,थेटर आणि मुख्य म्हणजे तुमचे हृदय या साऱ्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे . मनातले बोलते आहे ना अगदी तुमच्या . काय म्हणालात कशाबद्दल बोलते आहे . हां हां आता असे कळून न कळण्यासारखे वागायचेच  म्हणा . का म्हणून विचारत आहात तर उत्तर सांगतेच ,
फ्रेंड्स कॅलेंडरकडे पाहिलत का ?नवीन वर्षाचा एक महिना उलटून गेला आहे आणि फेब्रुवारीचा महिना उजाडला आहे .गळणाऱ्या पानांच्या गुलाबी थंडीची दुलई पांघरून बर्फाळलेली शहर एका मस्त उबदार तारखेची वाट पाहत आहेत .हो हो तीच तारीख जी तुमच्या मनात आहे .सात सुरांची आणि सात रंगाच्या होणाऱ्या बेरजेइतकी . १४ फेब्रुवारी अर्थात valentine day .उमटलेले हसू लपवणार्या तुमच्या गालावरच्या खळ्या मी पाहिल्या बर ?

तर मग काय ठरले प्लन ? कोणता ड्रेस घालायचा ? कोणता मुव्ही पहायचा ? मुख्य फंडा म्हणजे घरात काय सांगयचे ....कारण हल्ली घरात हा दिवस माहित नाही अस म्हणणारी भोळी ताई दादा कुणी नसतातच ...मग काय कारण ...जर्नल कशासाठी असतात फक्त खरडेघाशी ...छे असेही त्याचे उपयोग असतात ....हाच दिवस असतो मग महत्वाच्या सबमिशनचा महत्वाच्या लेक्चरचा ....पण हा valentine साजरा का करायचा ?काय वाटते बर तुम्हाला ? valentine या ख्रिस्ती हुतात्म्याच्या जगाला प्रेमाचा सन्देश दिला त्याच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो  ...पण तुम्हाला का साजरा करावासा वाटतो ? काय म्हणता माझ्याबद्दल सांगू ?
कोणत्याही संस्कृतीची भाषेची भिन्न अभिन्नतेची आडकाठी न ठेवता मला हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करायला आवडतो .दिल तो पागल है मध्ये माधुरी दीक्षित स्वतः स्वतः साठी गिफ्ट घेते .अगदी तसा साजरा करायला आवडतो आणि करते .कारण तसे एकटे कुठे असतो आपण ? कळत नकळत झुरतच असतो ना कुणासाठी तरी . मग मनातला स्वर्ग उभा राहतो अचानक डोळ्यासमोर . पापणी उघडून मिटायच्या आत ओठात एखाद ओळखीचे वाटणारे नाव येते .जागोजागी दिसायला लागतो तोच तोच ओळखीचा चेहरा .इतक्यात अचानक शेजारच्या दुकानावरच्या  पाट्यांवर लक्ष जाते आणि थक्क व्हायला होते जे नाव मनात घोळते आहे तेच इतक्याजवळ आसपास आहे .मोरपीस अंगभर फुलू लागते नाचू लागते .कारण देता येणार नाही इतका आनंद ओंजळीत ओसंडू लागतो . आपला चॉकलेट हिरो आमिर खान म्हणतो ना ?जैसा फ़िल्मोमे होता है हो रहा है हुबहू . आणि मग त्याच्याच एका चित्रपटातले गाणे सहज गुणगुणू लागतो पेहला नशा पेहला खुमार ....हाय...उफ्फ ....आणि मग हळू हळू इष्कीया बाज चढत जातो या कैफाला ....गुलाबाच्या पाकळ्यासोबत s/he loves me s/he hates me असे खेळ सुरु होतात .....उत्तर अर्थातच मनातले हवे असते . आणि खुपदा ते मिळते सुद्धा 

अरे हो प्रश्नाचे उत्तर बाजूलाच राहिले यार ...मी काय सांगत बसले ?
तर बरेचजण म्हणतात कशाला साजरा करायचा तो valentine ? वर्षाचे उरलेले ३६४ दिवस कुणी प्रेम करत नाही का ?हा इंग्रजी लोकांचा आपण का साजरा करायचा ? मुल मुली बिघडतात अश्याने ? आम्ही पण तरुणपणी तेच केल पण हि नवी पिढी हुशार आहे समजंस आहे .बर आहे तुम्हाला रासारोस प्रेम करायला मिळते आम्हाला मुलीशी बोलणे म्हणजे पाप . असे एक ना अनेक आवाज ऐकायला येतात ....

तर पब्लिक 
आयुष्य तसं खूप छोट आहे .तुम्ही मागे वळून पाहिलेत तर जाणवू लागेल तुम्हाला तुमचे इवले हात धरून तुम्हाला चालवणारी गती धावते आहे पळते आहे .तिचा हात निसटला तर तुम्ही जोरात पडण्याची भीती तुम्हालादेखील जाणवते आहे . तस पाहीले तर चे प्रेम बीम करायला वेळ आहे कोणाकडे ? पण स्वतःला थोडे रिग्रेट करायला शिकले पाहीजे . जे न मागता तुम्हाला मिळते आहे किमान त्याबद्दल तरी . तुम्हाला सकाळी रोजच चहा मिळतो घरी ऑफिस टपरीवर कुठेही घेत असाल जर एखादे दिवशी त्याची नवी चव अनुभवायला मिळाली तर जरूर कॉम्प्लिमेंट करा . जितका फेसबुकवर स्टेटस लाईक करायला वेळ लागतो तितकाच लागेल पण समोरच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्की capture करा .वेळेत बस मिळाली तर आनंद व्यक्त करा .दिवसभरातून एकदाही कंटाळा आला नाही .स्वतःला थंक्स म्हणा .पाहिलत किती छोट्या छोट्या गोष्टींनी मोठा आनंद भरता येतो . अश्याच कळत नकळत निसटून जाणाऱ्या क्षणाचे उत्सव म्हणून एक आश्वासक नात जबाबदारीने पेलून नेत असल्याबद्दल हा दिवस सेलिब्रेट  करायला काय हरकत आहे ?
सवयीने सार काही परिचित होत जात तस एकमेकांच्या सवयी आवडी निवडी स्वभाव कळू लागतात आय लव्ह यु हे तीन शब्द ऐकण्यासाठी केलेला अट्टाहास आठवतो आणि तेच शब्द घिसेपिटे डेलीसोपसारखे कंटाळवाणे होऊन जातात ते का होतात तर नात्यात होणारे बदल .मुळात आयुष्य हीच बदलणारी स्थिती तिथे नात प्रेम स्थिर कसे ते देखील ओघवते .हाच ओघ थोडासा पुढे घेवून इतके दिवस या आधी केलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा करायाला काय हरकत आहे ? उन्ह खावून खावून राकट दांडगट झालेली सखू शकू छाया इत्यादी पोटात इतकी माया घेवून फिरतात लेकरासाठी नवऱ्यासाठी तर यार तुम्ही भावनाचा ओलावा टिकवू शकत नाही का ?मी म्हटल ना थोडे रिग्रेट करायला शिकले पाहिजे आपण तर या क्षणाचे उत्सवाचे महत्व तुमच्या जगण्याला भान देत राहील .
पटतंय ना ?

पण दामटून डांबून प्रेम नाही होत नाही करता येत अन्यथा तो तुमचा मानसिक कारावास छळ होतो .तर अशीच एक छोटी गोष्ट जाता जाता  
साऱ्याच मित्रांनी मैत्रिणी मिळवल्या म्हणून यशने देखील अनुला प्रपोज केल .अनुने क्षणाचा विलंब न करता हो म्हणून टाकले .चार मित्रामध्ये यशची पत वाढली त्यालाही डबलसीट मिळाली .सगळ्या कॅम्पस मध्ये दोघांबद्दलच्या चर्चांना उत आला ते ऐकून सुखावत दोघेही होते हळूहळू कॉलेज संपायचे दिवस आले .पुढील शिक्षणाच्या सार्यांच्या वाटा बदलल्या अनु तिच्या गावी परतली यश त्याच्या गावी .अंतर वाढले संपर्क कमी झाला तो पूर्वीचा राहिला नाही ती पूर्वीची राहिली नाही . भांडणाचे विस्तार वाढू लागले   .अखेर दोघांनीही भेटून निर्णय घेतला .एकमेकांच्या वचनांची आठवण करून दिली पण नात दोघांनाही नकोसे झालेले कारण त्यात प्रेम हा मुद्दा गौण आणि प्रेमाची चार लोकांत प्रसिद्धी हा मुख्य हेतू हा सफल होऊन संपलादेखील होता .अखेर दोघे मुक्त मनाने वेगळे झाले .पुढे त्यांना समजून घेणारे पार्टनर त्याना भेटलेच ....

एका कवितेत विं दा करंदीकर म्हणतात देखील 

प्रेम करावे मुके अनामिक;प्रेम करावे होउनिया तृण;प्रेम करावे असे, परंतू….प्रेम करावे हे कळल्याविण.

तर मित्र मैत्रिणीनो प्रेम करा प्रेमाला समजून घ्या स्वतःची काळजी घ्या तुमच्या प्रिय व्यक्तीची देखील घ्या .....
happy valentine day .
हो हो एक कविता ऐकवल्याशिवाय रजा नाहीच घेणार मी मुळी  

माझ्या प्रिय आभाळा 
जिथे असशील तेथे खुशाल रहा 
तु दिसत नसलास 
तरी जाणवणार तुझ अस्तित्व 
मला साद देत राहत सांगत राहत 
मी आहे मी असेन 
जेव्हा भेटायला येशील तेव्हा 
अनुस्वारासारखी शब्दांना लागलेली 
तुझ्या स्पर्शाची बोटे   
तार झंकार छेडायला विसरु नकोस 
माझ्या अर्थहीन कवितांना 
तीच एक लय तुझ्या समेला येणारी  
मोराचा निशाद 
कोकीळेचा पंचम 
सार सार ऐकवायचे आहे तुला 
पण त्याआधी एखादा 
इंद्रधनुष्याच्या बासरीवर 
फुंकर धाल अन ती फुंकर 
वारयासोबत पाण्यात झुलणारया आभाळाला दे 
माझ्या प्रिय आभाळा 
Happy Valentine Day !! 






----कविता मोकाशी 




No comments:

Post a Comment