प्रेमकवितेपेक्षाही विरह व्याकुळता आर्तता काहीशा दुःखप्रधान कविता माझ्याकडून लिहिल्या जातात वाचल्या जातात अश्या कवितेमधून व्यक्त होणारी भावना वेदना खूप करुण वाटते मला ,माझ्या अलिप्त आणि एकल्ली स्वभावामुळे अशा कविता मला फार लवकर भावतात आपल्याश्या वाटतात अश्याच दोन काव्यकथा साधारण साडे तीन वर्षापूर्वी लिहिल्या होत्या त्या एकत्रित पोस्ट करते आहे त्यापैकी एका काव्यकथेचे शीर्षक "लंपडाव" ,आणि दुसरीचे "गजरयातील दोन कळ्या"
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लंपडाव
1
तुझे आरशासारखे नितळ
अंतरंग मी जाणून आहे
मग मुखवट्याची काय गरज ?
... पण तुला ....
लपंडाव खेळायचा आहे म्हणे
हम्म चल खेळू मग
पण हरणार तूच आहेस
नेहमीप्रमाणे ...कारण ....
मी ओळखलंय तुला ...
तुझ्या हृदयाच्या
तळापर्येंत पोहोचणारा प्रवास
कितीतरी जन्मात मी केला आहे
अगदी त्या
आभाळाच्या आरश्याचा जरी
तू मुखवटा लावलास तरी
ओळखेन मी तुला .....!!
पण तुला लंपडाव खेळायचं आहे
खरय ना ??
2
शोध शोध ...शोधत रहा....
या जन्मात नवा
शोध लागेल कदाचित ....
नाहीतर आहेच
तुझ माझ शून्याच रिंगण
तू माझ्यापाठी
मी तुझ्यापाठी
धावतोय वेड्यासारखे
पण तुला
लंपडाव खेळायचा आहे ना ......
3
मला मुळात हाच प्रश्न पडलाय की
कशासाठी हा लपंडाव ?
तुझ्या मोठेपणापुढे
माझ इवलपण कधीच झाकून गेलंय
तुझ्या घनगर्द आभाळाच्या सावलीत ....
मला माझ होवून कधी जगण्याचे
स्वप्नच पडले नाही ....
मला आकांक्षा आहेत त्या
तुझ्यात तुझी होवून जगण्याच्या
मग हा लंपडाव तरी कशासाठी ?
हम्म ठीक आहे ......
तुला खेळायचाच आहे तर
पण मी तुला नक्की शोधून काढेन ....
एका थेंबाला
सागराची वाट सापडणे
अस कितीसे अवघड
तुलाही हे ठावूक आहे
पण तुला लंपडाव खेळायचा आहे
खरय ना ?
4
निरभ्र आकाश ...निष्पर्ण झाड....
निस्तेज संध्याकाळ ......
पाण्याचा रंग ...अमावस्येच चांदण ...
जमिनीतला खोल आटलेला झरा ...
उफाणलेल्या दर्यातली
क्षणभर दुरावणारी शांतता .
हृदयामधली रिकामी घर
मुठीतून हळूहळू निसटणारी
किनाऱ्याची वाळू
पालापाचोळ्याची सावली
अंधाराच्या काजळलेल्या दिशा
दोन श्वासातली दरी
मौनस्थ हुंदके .....
दोन शब्दातले अंतर
वादळाचे पोरकेपण
सारी सारी तुझी लपायची
ठिकाणे माहित आहेत मला ....
तसही देवाला पाहिलंय कुणी
पण तो आहे नक्की .....
तुझ्यात आणि त्याच्यात
फरक इतकाच की....
तू दिसतो आहेस मला
पण तू आहेस का नाहीस ?
माहित नाही
या प्रश्नाला उत्तर तेच तेच
तू लंपडाव खेळतो आहेस माझ्याशी
5
तुला काय वाटत ?मी चिडले तुझ्यावर ?
तुझा लंपडाव पाहून.....
अहं ....मुळीच नाही
मला आवडतोय हा
तुझा बहुरूपीपणा
तुझे रंगवलेले मुखवटे ...
तुझे वेगवेगळे भावरंगी चेहरे ....
तुझा एकपात्री प्रयोग
तुझ नाटक ......
अधिक आवडू लागल आहे मला
कारण तुला ठावूक आहे का ?
त्याच कारण एकंच
तुझे नितळ पारदर्शी अंतरंग
मी जाणून आहे
तुझ्या या नाटकात तू माझा
प्रवेश नाही लिहिलास
पण तुझ्या नकळतपणे एक
भूमिका तू दिली आहेस मला
तुझ्या श्रोत्याची ......!
दिसले ? सापडले मी तुला ?
मी प्रेक्षकातून नाही
मी विंगेतून नाटक पाहते आहे
मी फक्त वाट पाहते आहे
पडदा पडण्याची .....
पण या नाटकानंतर काय
प्रश्न आहेतच ....संपलेले नाहीत .....
6
समज कधी चुकून माकून
आपण जवळ आलो तर .....
दूर जाण्याची भीती आहेच
तुझ्या माझ्या गाठीला
तुझ माझ भेटण म्हणजे
त्या क्षितिजासारख
आपल्या भेटीला .....
ग्रीष्म काय वसंत काय
उन काय पाऊस काय
दिवस काय नि रात्र काय
काटे काय नि गुलाब काय
आपण भेटलो काय
आणि नाही भेटलो काय ?
तरी दोन्ही सारखंच .....!!
दोघांना आहेच ना जवळ
असल्याचा भास .....
भेटलो तर देवू ओंजळभर शपथा
आणि पुन्हा घेवू सात जन्माच्या
सोबतीच्या आणा भाका
आणि नाही भेटलो तर ....
स्वप्न होत एक निरस म्हणू अन
विसरून जावू ....काही आठवायच्या आत
छे ...कशाला हा आटापिटा ?
जवळ दूर जाण्याचा वेडेपणा
हा लंपडाव काय वाईट आहे ?
खोट्या तर खोट्या आशा तरी आहेत
माणूस आशेवरच तर जगतो
खरच लंपडाव इतका वाईट नाही ...
खरय ना ?
7
शोध ना शोध ना लवकर मला
माझा अर्धा जीव सुकून गेला आहे
तू दिसतो आहेस मला
हिरव्यागार पानाच्या आभाळातूनही
मखमली करणार तुझ
निळेपण नजरेत भरते आहे
माझ्या पैंजणाचे नाद
तुझ्या अंगणातून गळणाऱ्या
तारकांमधून ऐकू नाही का येत तुला
नाहीतर हरलो म्हणून
कबूल तर कर...काय होत त्याने ?
नाहीतर मग मला
चवडे उंच करून चुंबून घेवू दे
सार आभाळ तुझ ....
विझवून टाकू दे कितीतरी जन्माच्या
उरलेल्या मनावरच्या खुणा
जखमा ...खपल्या ...व्रण....
कडाडून मारू दे मिठी अगदी गहिरी .....
शांत मालवलेल्या रात्रीइतकी
तो बघ तिकडे सूर्य कलंडला आहे
आता क्षणात ही अंधारून जाईल वेळ
तुला मी दिसणार नाही अन मला तू
पुन्हा एका रात्रीतून
तोच जुनापुराणा डाव
जीवघेणा लंपडाव
8
मुंडा हात ...अनवाणी पावले ...
उसवलेली कुंकवाची जाळी .....
विस्कटलेले मोकळे रुखे रुखे केस ...
पापणीच्या कडेने निसटून गेलेले काजळ
तुटलेली जाईची फुले .....
चोळाबोळा झालेला श्यामल शालू
अन ओठावर विरलेला
तृप्तेचा रक्तिमा ......
तुझ वनवासीपण जागे आहे माझ्यात
क्षणात पालटलस तू सार
तुझ्या उन्हानाळलेल्या
थंडगार स्पर्शाने ....
तू विरघळला आहेस
माझ्या गात्रागात्रात
माझ मी पण संपल केव्हाच
आता माझ्याजवळ आहे तो
तू पहाटेच मालवलेला जोगिया
खरच संपला आपला लंपडाव ?
पण हे तुझ जग मला ???
काही आणखीनच सांगते
का खेळतोस माझ्याशी लंपडाव
9
धुक ओसरलं... पहाट झाली ....
माझे डोळेही भरून गेले ...
तू पाठ फिरवली आहेस माझ्याकडे
मी रात्रभर तेवत राहिले समईसारखी
फक्त तुला येवून भेटण्यासाठी .....
तुझा दोष नाही ....
मी ऐकत राहिले तुझे सावल्यांचे आवाज
तू कालही पाठ करून उभा होता
आता कसला लंपडाव ?
मी फिरते माघारी ....
पण परतीचे रस्ते कुठले
कुठला मुक्काम कुठल ठिकाण माझ ?
किती जीवघेणा होता हा लंपडाव
---कविता
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गजऱ्यातील दोन कळ्या....
1
पारिजातकाचे फुल ....
माझ्या दोन बोटांच्या चिमटीतून
उजवीकडून डावीकडे फिरणारे .....कि .
अहं....सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे
हळू हळूच झुकणारा .....
चंद्राच्या छायेच्या शीतलतेत
शुक्राच्या मंद प्रकाशाच्या आडोशात ....
अन अचानक समोर येणारी ...
तुझ्या हाताची ओंजळ आणि
तुझा घोगरा आवाज ......"गजरा "
अगदी नेहमीप्रमाणे .............
हम्म ....मग पुन्हा रोजचा खेळ ....
फुलाचा सुगंधाशी आणि
सुगंधाचा फुलाशी .......मग ....
मोगरा पारीजातकामध्ये
सांडून जायचा ....हरवून जायचा ....
तुझ्या हातात उरायचा तो फक्त ....
गंध मागे सोडून गेलेला ...आणि
फुले घेवून गेलेला ....गजरयाचा धागा ...
आणि ......माझ्याकडे उरायाच्या ...
नेहमीसारख्याच ...न उमललेल्या ....
गजऱ्यातील दोन कळ्या..........
2
धरणीला भेटण्यासाठी .....वाकलेल आभाळ ....
आणि तुझ्या खांद्यावर टेकलेल डोक ...
दोन्ही कस एकसारख वाटायचं .....
अस वाटायचं ....
आभाळातून जलद गतीने
फिरणारे ते मेघ ...
फिस्कटलेले त्यांचे रंग ....
चिव चिव करणाऱ्या या तारका
अंगावरून उतरून जाणारा...
हा उष्ण उष्ण वारा ......
हा नुसताच आभास आहे ...
आणि ती क्षितिजरेष ...
सारा आभास कशी उचलून धरते आहे .....
आणि तुझ्या तोंडातून
शब्दाची एकच....पुटपुट..."क्षितीज"
आणि जीवघेणा प्रश्न ......
"राणी हे क्षितीज म्हणजे प्रेमाची
सुरुवात असेल की......शेवट ......"
3
वारयाची फडफड ...पानांची तडफड ...
दूर गावचा देस ...नदीजवळची वेस ..
मंद मंद गार गार मारवा ....
झाडावरचा एकटाच पारवा....
गहिवरलेल्या कातरवेळा ...
हम्म .....गजऱ्यातील दोन कळ्या...
आणि ........
तुझी शून्य शून्य नजर
माझ्या कवितांची वहीवर
या दोन्हीच्या मधेच
माझा तळहात ....
तळहातावर ...बारीक रेघा ...
त्यात दिसणारं तुझ नाव ..
त्यावर त्या दोन कळ्या ....
तुझे दोन अश्रू ...माझी बंद मुठ ...
आणि ...तुझ वेड्यासारख बोलण...
"पुन्हा अस काही लिहिलस ना
दूर निघून जाईन हं मी .....
वेडाबाई काहीही लिहितात का "
4
रंग आसवांचे .....उडून गेले .....
गंध व्यथांचे ....दरवळून गेले ..
किती काजळरेघा वाहून गेल्या
कितीदा ...पापणीला चाटून गेल्या ...
क्षणाचाच जीव तोही उदासून गेला ...
आणि श्वास.. क्षणात कोमेजून गेला....
आता कशाला विचारतोस ,
का रडतेस म्हणून ...???
तूच म्हणालास की......
"खर प्रेम करणारे .....
लैला मजनू ...रोमिओ जुलीयेट...
हीर रांझा ....आणि.. राधा कृष्ण ...
याचे कधी लग्न झाले नाही म्हणून "
5
पुरीयेचा प्रहर....
कधीचा टळून गेला होता ...
अमावास्येच्या चांदण्यात ...
आता बागेश्रीचा प्रहर चालू होता ....
तू म्हणत होतास ....
"चंद्र नसताना...चांदण खूपच जास्त ....
जाणवत नाही का ? व .. सुंदरही दिसत .."
कस सांगू तुला .....??.
"पुरीयेतले कोमल सूर
वर्ज्य केल्यानंतरसुद्धा
तीव्र स्वरांमध्ये .....
बागेश्री अधिक सुरात येते ....
निरंजनातल तेल संपताना
दिवा जास्त उजळून निघतो ....
कारण ....
जाणार सुख दुख जरूर देवून जात
शेवटी सुखाने दिलेलं ते दुख ...
ते त्याच्याएवढच भरजरी असत.....
गजरा नसतानादेखील ......
उरणाऱ्या त्या दोन कळ्याइतकं...."
6
पारिजातकाच्या झाडाखालच्या ....
त्या लाल लाल मातीवर ...
मी तुझ नाव लिहिलं होत ...
आणि तू ....
माझ्या गालावर टीचकी मारत....
नुस्सत हवेतल्या हवेत
तिथे माझ नाव गिरवत होतास ....
म्हणत होतास ........
"पाहूया कुणाच नाव जास्त राहत ...
ज्याच राहील ....त्याच जास्त प्रेम"
हे काय ? ....नख लागल तुझ मला ...
गालावर रक्त ....रक्ताचा ओघळ ....
मी वेड्यासारखी ओरडत होते
"मी जिंकले ...मी जिंकले ...."
आणि तू म्हणत होतास .....
"अग ...किती लागल तुला ...
I am very Sorry....आता
घरी कशी जाणार तू ....
घरचे काय म्हणतील तुला ?"
7
तुझी वाट पाहता पाहता
तुझचं वाक्य घोळवत होते ....
"आज जरा उशीरा येईन हं "
झाडावरून एक टपोरा थेंब
गालावर पडला ....पाउस आला
पण समोर हे काय ...इंद्रधनुष्य ..
"इंद्रधनुष्य आल कि पाऊस नाही येत "
आता मग ??
पायाखालच्या जमिनीने ....आज ...
फक्त वाऱ्याचा खेळ सोसला होता ...
पाऊस तर येणारच न्हवता ...
आता तिने पाहायचं फक्त ...
दूर दूर उधळलेल्या रंगाची उधळण ...
काळे ढग ....पांढरे ढग ....
ढगांचे चित्रविचित्र आकार ...
इंद्रधनुष्याचे रंगीत हुंकार ...
सुंदर स्वप्नांची सुंदर राख
अस्ताचा सूर्य गाठणारी आग
छे काहीतरीच आग कुठे?
क्षितिजावर उठलेल मृगजळ ...
आणि विजांनी कातरलेल आभाळ ..
विजा विजा ?? कश्या आल्या ??
बापरे अंधार झाला ....
.....शेवटी तू आज आलाच नाहीस
8
मी रडत होते ...
"का नाही आलास काल ?
मी नाही बोलणार तुझ्याशी "
तू स्फुंदत होतास ...
"अग ऐक तर खर
अचानक पाहुणे कुणीतरी ....
एका मुलीचे वडील ...
त्यांच्या मुलीसाठी मला .....
...........अग ....अग .......
वेडी आहेस का .....??
अस कस करेन मी ??
तुझा हात माझ्या हातात होता ...
वाटलं आभाळ मुठीत येवून ...
तस्सच थांबल आहे ....हम्म
पण आजही ....समोर ...
कालचे..... इंद्रधनुष्य ...
आणि पायाखाली जमीन ...
उन्हानेने रापलेली ......??
आज कोणता खेळ होता ?
9
वाढदिवसाच... चाफ्याच फुल ...
हातामध्ये ....तोरणं ...तोरणं
लहडलेल्या बांगड्यांची ....
कानातले डूल ....झोके घेणारे ...
ओळखीचा ...सुगंधी दरवळ ...
मोगऱ्याचा....गजरयाचा.....
आणि हाताला थंडगार स्पर्श ...
एका काचेचा...... आणि
तुझा आवाज ..."हम्म गिफ्ट "
गिफ्ट ......काचेची दोन कबुतर ...
नाही नाही ...कबुतर नाही
एक बुलबुल होती गाणारी ...
स्तब्ध ...शांत ...झाडावर बसलेली
तिला पंखाच्या छायेत घेणारे ....
पंख पसरलेलं ....कबुतर ....
नाही नाही ....दूर दूर उडून जाणार .....
दूर जाणार कबुतर .....
10
मनाला आधार
बंधनाची काटेरी तार
डोळाभर पाणी ...
कुण्या काळजाची कहाणी
चांदण्याचा शृंगार
सावलीने पहुडलेला अंधार .
तुझी माझी भेट
पारिजातकाच फुलांच बेट...
वेळ अशी कातर
तुझ्या माझ्यातले अंतर
सुखातल दुख
दुखातल सुख .....
टेकलेल सूर्यबिंब ...
स्वल्पविराम कि पूर्णविराम ...
नक्की काय आहे हे सार ......?
सार काही समजण्या पलीकडच ...
सारच ....तू ....मी ....आपल प्रेम ......
आणि तू गदागदा हलवून मला
विचारत होतास .....
"सांग ना राणी .....
माझ्याकडे नेहमी धागा ....
आणि तुझ्याकडे कळ्या अस का..?.
आणि फुल तर खाली सांडून जातात "
11
झेंडूच्या वास नसलेल्या
फुलावर बसलेलं फुलपाखरू ...
पण तरीही आनंदात होत .....
आणि गवताच्या पानावर
असलेला दवबिंदू .....
कदाचित पुढच्या क्षणी ...
मातीत विरून जाईल सुद्धा ......
पण ........
दोन्हीमध्ये फारसा फरक
वाटत न्हवता .....
आणि तू मला विचारत होतास
"दोन्हीपैकी काय सुंदर आहे ?"
मी म्हणाले ....
"प्रेमात जगण आणि मरण तस
दोन्ही सारखंच.....
तो बघ तारा तुटला ........
कदाचित जगण मरण यापेक्षा
प्रेमात तुटण सुंदर दिसत ..."
12
तुझा खर्जातला आवाज .....
"काय झाल हम्म ?
एवढी निराश का ??
रोज काहीतरी चिवचिव करते .....
रात्री स्वप्नातून हटत नाही ....
......तुझा चेहरा .......
पापणीला स्वप्न टोचत
असल्याचा भास होतो ...आणि
तुझ्या अबोल आसवांचा ...
...आवाज ...आवाज ...येतो ....."
तुला बिलगून मी हुंदकत होते ...
कंठातून शब्द येत न्हवते ....
"त्या मुलीचे वडील ....
तू ....तुझ लग्न ........
ते इंद्रधनुष्य ....ते कबुतर ...."
तू फक्त नकारार्थी .....
...........मान हलवत होता
तुझ्या डोळ्यातून पाणी ...
ठप्प ....ठप्प ....ठप्प ....
गालावरची नखाची जखम
खपली उडाली होती .....
....त्यावर तुझी आसवे ...
जखम चुरचुरत ....होती ....
"दुखाचे अश्रू खारट असतात ना??
13
आज आभाळ कस मोकळ होत ....
एकदम मोकळ .....मोकळ .....
ढगांचा धूर न्हवता .....की....
मंदिरातल्या घंटेचा सूर न्हवता ....
धुळीची ....पावले न्हवती ....की
संधीप्रकाला चाहूल न्हवती .....
सप्तऋषी तारकेतली ...
अरुंधती आणि वशीष्ठ .......
फक्त ...हळू हळू ....तेजाळत होते ...
सार काही मंद ....मंद ...मंद ...
गजबजत होते ..... फक्त माझे प्रश्न .
..........प्रश्न आणि प्रश्न ..........
माझे प्रश्न आणि तुझी उत्तर ....
"तू म्हणजे ?.....' मी '
मी म्हणजे ?.......'तू'
तू मी म्हणजे ?.......'आपल नात'
नात म्हणजे ? .....'प्रेम' .....
प्रेम म्हणजे? ....'विश्वास' ....
विश्वास म्हणजे ....?
.........'देवाच्या पायावरच फुल'
फुल म्हणजे......?
सुंदर सुंदर हास्य कळ्यांचे
कळी म्हणजे ....?"
तुझा वैतागलेला आवाज ?
किती हे प्रश्न ......?
आणि मी म्हणत होते ....
"काय करू माझ्याकडे फक्त
प्रश्न आहेत ...आणि तुझ्याकडे ....
फक्त ....फक्त ....उत्तर ........
हातातल्या कळ्या तस्शाच
अनुत्तरीत ... अनुत्तरीत.... "
14
पारिजातकाच्या झाडाला ....
.....टेकून उभा होतास .......
नेहमी मी उभी राहायचे
पण आज तू .....आणि ....
माझ वाक्य म्हणलास ...
"काय हे कित्ती कित्ती उशीर ?"
हम्म घ्या ....गजरा ...घ्या ...."
रोजचा खेळ .....आता तर ...
पारीजातकाला पण...मोगरा ...
.....आवडायचा ....हं..खरच ....
हे काय झाले ....
गजरयातली सगळीच फुल ...
...सांडून गेली ...सांडून गेली ...
हातात कळी न्हवती ...माझ्या ...
आणि धागा ...गजरयातला....
तुटला ...अस कस झाल ?
मी भांबावलेल्या स्वरात बोलले ...
"तू मोगरा समजून जुईचा गजरा
....आणलास .....जुईचा ...गजरा ...."
तू ....मी ....आणि .....आपल्या
दोघांमध्ये सांडलेली जुईची फुल ......
15
चिमुकल्या संसारांची ....
.....चिमुकली स्वप्न .....आणि...
तू ...मी .....रेखलेले ....
उंचच ...उंच ...कल्पनाचे मनोरे ....
छोटस घर ....कौलारू घर ...
कौलारुच ..त्यातून कवडसे येतात ....
अग्गदी चांदण्यासारखे दिसणारे
घराला चारच खांब ....
...लाकडाचे हं....लोखंडाचे नको ...
काळी काळी ...थंडगार फारशी ...
छोटस अंगण ...
अंगणात ...तुळशी वृंदावन ...
मोगऱ्याचा ताटवा....आणि ...
हा असा पारीजात पण हवा ....
पण मी बुलबुल ....काळी काळी ...
.......सुरांना...आळवणारी .......
आणि तू ...पांढराशुभ्र कबुतर ....
....शांततेच प्रतिक ......
"आपल्या घरातून परवानगी...
......कस व्हायचं ...काय करायचं ?"
मी तुला नको असणारा प्रश्न
विचारला होता ......
तू ताडकन उठून दूर गेलास ....
मैलभर पसरलेलं ....उजाड माळरान
उभारलेला पारिजात ...आणि ...
......एकटीच शांत बसलेली मी
16
सूर्याचा प्रकाश अडवून
किती पाखर ये जा करत होती .....
पानाची सावली ...
वाऱ्याने हलत होती ....
कवडसे चिरत होती ....
कसली हि अनामिक हुरहूर .....
कुठल्या काळच्या....
निराशेने कवाड खोलल होत ......
माहित नाही ....माहित नाही ....
नक्की काय ...होत .....
आत या मनाच्या गाभाऱ्यात....
इतक्यात तुझा आवाज .....
वाटले या अंधारी तळघरात ....
काहीतरी ओळखीचे आहे ...
"हम्म राणी गजरा ....
बर झाल लवकर आलीस ....
नाही ....वेळ नाही ...
दवाखाना ....बाबांना Heart Attack...
......तिथूनच येतो आहे ....
चल ...मी जातो ....."
माझ्या तोंडात शब्द विरून गेले
"अरे जातो नाही ,'येतो' म्हणाव"
17
तुझी दूरवर येणारी ....आकृती ....
मी धावत येवून तुला मिठी
मारणार इतक्यात तू बोललास ....
"थांब तिथेच ...तिथेच .....
पुढे नको येवू ...आधी ऐक .."
तू एकटाच बडबडत होता ....
.
"राणी लग्न ठरलं माझ ....
बाबाच आयुष्य ......डॉक्टर ....
वेळ नाही जास्त ....जास्त ....
तू बुलबुल ....मी कबुतर ....
कस कस सांगायचं ....बाबांना ...
घरी ....Tension ...Tension....
आपल्याबद्दल ....तू मी ...आपण ..
नाही थांबलो ...तू तुझ प्रेम ..."
आज एकही अश्रू खळला नाही
तू उन्हात होतास ....
आणि मी सावलीत ...पारिजाताच्या ....
जीवात जीव न्हवता .......
....हृदय पोखरून ....निघत होत .....
पण आज भीती नाही वाटली ...
काळजी वाटली ....फक्त .....
उन्हाच्या तिरपीची....आणि तुझी ....
जे मागितलं होतंस ते तुझ न्हवत ...
आणि मिळालेलं पण ....
.........तुझ न्हवत .....तुझ न्हवत
फक्त काळजी वाटली तुझी ........
18
आज पण आले आहे .....
पारिजातकाच्या झाडाजवळ मी ....
काल जस्स होत तस्सच आहे सार ....
फक्त तू नाहीस ....बाकी सार आहे ....
स्वर्गातून शाप घेवून .....
आलेला....पारिजात ....पारिजात ....
आपल्या प्रेमाचा दरवळ ...
परीजाताकामध्ये हरवलेला .....
मोगरा .....गजऱ्याचा धागा .....
आपली सुंगंधी प्रेमकथा ....
अमरप्रेम ....अमरप्रेम .......
तू काल ओठावर दिलेलं ....
फुल ...निरोपाच ....वाळलेलं ...
शांत झोपलेली मी ....आणि ...
बोटात चिमटीत कुसकरलेल्या ...
"दोन गजरयातील कळ्या...."
-------कविता मोकाशी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लंपडाव
1
तुझे आरशासारखे नितळ
अंतरंग मी जाणून आहे
मग मुखवट्याची काय गरज ?
... पण तुला ....
लपंडाव खेळायचा आहे म्हणे
हम्म चल खेळू मग
पण हरणार तूच आहेस
नेहमीप्रमाणे ...कारण ....
मी ओळखलंय तुला ...
तुझ्या हृदयाच्या
तळापर्येंत पोहोचणारा प्रवास
कितीतरी जन्मात मी केला आहे
अगदी त्या
आभाळाच्या आरश्याचा जरी
तू मुखवटा लावलास तरी
ओळखेन मी तुला .....!!
पण तुला लंपडाव खेळायचं आहे
खरय ना ??
2
शोध शोध ...शोधत रहा....
या जन्मात नवा
शोध लागेल कदाचित ....
नाहीतर आहेच
तुझ माझ शून्याच रिंगण
तू माझ्यापाठी
मी तुझ्यापाठी
धावतोय वेड्यासारखे
पण तुला
लंपडाव खेळायचा आहे ना ......
3
मला मुळात हाच प्रश्न पडलाय की
कशासाठी हा लपंडाव ?
तुझ्या मोठेपणापुढे
माझ इवलपण कधीच झाकून गेलंय
तुझ्या घनगर्द आभाळाच्या सावलीत ....
मला माझ होवून कधी जगण्याचे
स्वप्नच पडले नाही ....
मला आकांक्षा आहेत त्या
तुझ्यात तुझी होवून जगण्याच्या
मग हा लंपडाव तरी कशासाठी ?
हम्म ठीक आहे ......
तुला खेळायचाच आहे तर
पण मी तुला नक्की शोधून काढेन ....
एका थेंबाला
सागराची वाट सापडणे
अस कितीसे अवघड
तुलाही हे ठावूक आहे
पण तुला लंपडाव खेळायचा आहे
खरय ना ?
4
निरभ्र आकाश ...निष्पर्ण झाड....
निस्तेज संध्याकाळ ......
पाण्याचा रंग ...अमावस्येच चांदण ...
जमिनीतला खोल आटलेला झरा ...
उफाणलेल्या दर्यातली
क्षणभर दुरावणारी शांतता .
हृदयामधली रिकामी घर
मुठीतून हळूहळू निसटणारी
किनाऱ्याची वाळू
पालापाचोळ्याची सावली
अंधाराच्या काजळलेल्या दिशा
दोन श्वासातली दरी
मौनस्थ हुंदके .....
दोन शब्दातले अंतर
वादळाचे पोरकेपण
सारी सारी तुझी लपायची
ठिकाणे माहित आहेत मला ....
तसही देवाला पाहिलंय कुणी
पण तो आहे नक्की .....
तुझ्यात आणि त्याच्यात
फरक इतकाच की....
तू दिसतो आहेस मला
पण तू आहेस का नाहीस ?
माहित नाही
या प्रश्नाला उत्तर तेच तेच
तू लंपडाव खेळतो आहेस माझ्याशी
5
तुला काय वाटत ?मी चिडले तुझ्यावर ?
तुझा लंपडाव पाहून.....
अहं ....मुळीच नाही
मला आवडतोय हा
तुझा बहुरूपीपणा
तुझे रंगवलेले मुखवटे ...
तुझे वेगवेगळे भावरंगी चेहरे ....
तुझा एकपात्री प्रयोग
तुझ नाटक ......
अधिक आवडू लागल आहे मला
कारण तुला ठावूक आहे का ?
त्याच कारण एकंच
तुझे नितळ पारदर्शी अंतरंग
मी जाणून आहे
तुझ्या या नाटकात तू माझा
प्रवेश नाही लिहिलास
पण तुझ्या नकळतपणे एक
भूमिका तू दिली आहेस मला
तुझ्या श्रोत्याची ......!
दिसले ? सापडले मी तुला ?
मी प्रेक्षकातून नाही
मी विंगेतून नाटक पाहते आहे
मी फक्त वाट पाहते आहे
पडदा पडण्याची .....
पण या नाटकानंतर काय
प्रश्न आहेतच ....संपलेले नाहीत .....
6
समज कधी चुकून माकून
आपण जवळ आलो तर .....
दूर जाण्याची भीती आहेच
तुझ्या माझ्या गाठीला
तुझ माझ भेटण म्हणजे
त्या क्षितिजासारख
आपल्या भेटीला .....
ग्रीष्म काय वसंत काय
उन काय पाऊस काय
दिवस काय नि रात्र काय
काटे काय नि गुलाब काय
आपण भेटलो काय
आणि नाही भेटलो काय ?
तरी दोन्ही सारखंच .....!!
दोघांना आहेच ना जवळ
असल्याचा भास .....
भेटलो तर देवू ओंजळभर शपथा
आणि पुन्हा घेवू सात जन्माच्या
सोबतीच्या आणा भाका
आणि नाही भेटलो तर ....
स्वप्न होत एक निरस म्हणू अन
विसरून जावू ....काही आठवायच्या आत
छे ...कशाला हा आटापिटा ?
जवळ दूर जाण्याचा वेडेपणा
हा लंपडाव काय वाईट आहे ?
खोट्या तर खोट्या आशा तरी आहेत
माणूस आशेवरच तर जगतो
खरच लंपडाव इतका वाईट नाही ...
खरय ना ?
7
शोध ना शोध ना लवकर मला
माझा अर्धा जीव सुकून गेला आहे
तू दिसतो आहेस मला
हिरव्यागार पानाच्या आभाळातूनही
मखमली करणार तुझ
निळेपण नजरेत भरते आहे
माझ्या पैंजणाचे नाद
तुझ्या अंगणातून गळणाऱ्या
तारकांमधून ऐकू नाही का येत तुला
नाहीतर हरलो म्हणून
कबूल तर कर...काय होत त्याने ?
नाहीतर मग मला
चवडे उंच करून चुंबून घेवू दे
सार आभाळ तुझ ....
विझवून टाकू दे कितीतरी जन्माच्या
उरलेल्या मनावरच्या खुणा
जखमा ...खपल्या ...व्रण....
कडाडून मारू दे मिठी अगदी गहिरी .....
शांत मालवलेल्या रात्रीइतकी
तो बघ तिकडे सूर्य कलंडला आहे
आता क्षणात ही अंधारून जाईल वेळ
तुला मी दिसणार नाही अन मला तू
पुन्हा एका रात्रीतून
तोच जुनापुराणा डाव
जीवघेणा लंपडाव
8
मुंडा हात ...अनवाणी पावले ...
उसवलेली कुंकवाची जाळी .....
विस्कटलेले मोकळे रुखे रुखे केस ...
पापणीच्या कडेने निसटून गेलेले काजळ
तुटलेली जाईची फुले .....
चोळाबोळा झालेला श्यामल शालू
अन ओठावर विरलेला
तृप्तेचा रक्तिमा ......
तुझ वनवासीपण जागे आहे माझ्यात
क्षणात पालटलस तू सार
तुझ्या उन्हानाळलेल्या
थंडगार स्पर्शाने ....
तू विरघळला आहेस
माझ्या गात्रागात्रात
माझ मी पण संपल केव्हाच
आता माझ्याजवळ आहे तो
तू पहाटेच मालवलेला जोगिया
खरच संपला आपला लंपडाव ?
पण हे तुझ जग मला ???
काही आणखीनच सांगते
का खेळतोस माझ्याशी लंपडाव
9
धुक ओसरलं... पहाट झाली ....
माझे डोळेही भरून गेले ...
तू पाठ फिरवली आहेस माझ्याकडे
मी रात्रभर तेवत राहिले समईसारखी
फक्त तुला येवून भेटण्यासाठी .....
तुझा दोष नाही ....
मी ऐकत राहिले तुझे सावल्यांचे आवाज
तू कालही पाठ करून उभा होता
आता कसला लंपडाव ?
मी फिरते माघारी ....
पण परतीचे रस्ते कुठले
कुठला मुक्काम कुठल ठिकाण माझ ?
किती जीवघेणा होता हा लंपडाव
---कविता
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गजऱ्यातील दोन कळ्या....
1
पारिजातकाचे फुल ....
माझ्या दोन बोटांच्या चिमटीतून
उजवीकडून डावीकडे फिरणारे .....कि .
अहं....सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे
हळू हळूच झुकणारा .....
चंद्राच्या छायेच्या शीतलतेत
शुक्राच्या मंद प्रकाशाच्या आडोशात ....
अन अचानक समोर येणारी ...
तुझ्या हाताची ओंजळ आणि
तुझा घोगरा आवाज ......"गजरा "
अगदी नेहमीप्रमाणे .............
हम्म ....मग पुन्हा रोजचा खेळ ....
फुलाचा सुगंधाशी आणि
सुगंधाचा फुलाशी .......मग ....
मोगरा पारीजातकामध्ये
सांडून जायचा ....हरवून जायचा ....
तुझ्या हातात उरायचा तो फक्त ....
गंध मागे सोडून गेलेला ...आणि
फुले घेवून गेलेला ....गजरयाचा धागा ...
आणि ......माझ्याकडे उरायाच्या ...
नेहमीसारख्याच ...न उमललेल्या ....
गजऱ्यातील दोन कळ्या..........
2
धरणीला भेटण्यासाठी .....वाकलेल आभाळ ....
आणि तुझ्या खांद्यावर टेकलेल डोक ...
दोन्ही कस एकसारख वाटायचं .....
अस वाटायचं ....
आभाळातून जलद गतीने
फिरणारे ते मेघ ...
फिस्कटलेले त्यांचे रंग ....
चिव चिव करणाऱ्या या तारका
अंगावरून उतरून जाणारा...
हा उष्ण उष्ण वारा ......
हा नुसताच आभास आहे ...
आणि ती क्षितिजरेष ...
सारा आभास कशी उचलून धरते आहे .....
आणि तुझ्या तोंडातून
शब्दाची एकच....पुटपुट..."क्षितीज"
आणि जीवघेणा प्रश्न ......
"राणी हे क्षितीज म्हणजे प्रेमाची
सुरुवात असेल की......शेवट ......"
3
वारयाची फडफड ...पानांची तडफड ...
दूर गावचा देस ...नदीजवळची वेस ..
मंद मंद गार गार मारवा ....
झाडावरचा एकटाच पारवा....
गहिवरलेल्या कातरवेळा ...
हम्म .....गजऱ्यातील दोन कळ्या...
आणि ........
तुझी शून्य शून्य नजर
माझ्या कवितांची वहीवर
या दोन्हीच्या मधेच
माझा तळहात ....
तळहातावर ...बारीक रेघा ...
त्यात दिसणारं तुझ नाव ..
त्यावर त्या दोन कळ्या ....
तुझे दोन अश्रू ...माझी बंद मुठ ...
आणि ...तुझ वेड्यासारख बोलण...
"पुन्हा अस काही लिहिलस ना
दूर निघून जाईन हं मी .....
वेडाबाई काहीही लिहितात का "
4
रंग आसवांचे .....उडून गेले .....
गंध व्यथांचे ....दरवळून गेले ..
किती काजळरेघा वाहून गेल्या
कितीदा ...पापणीला चाटून गेल्या ...
क्षणाचाच जीव तोही उदासून गेला ...
आणि श्वास.. क्षणात कोमेजून गेला....
आता कशाला विचारतोस ,
का रडतेस म्हणून ...???
तूच म्हणालास की......
"खर प्रेम करणारे .....
लैला मजनू ...रोमिओ जुलीयेट...
हीर रांझा ....आणि.. राधा कृष्ण ...
याचे कधी लग्न झाले नाही म्हणून "
5
पुरीयेचा प्रहर....
कधीचा टळून गेला होता ...
अमावास्येच्या चांदण्यात ...
आता बागेश्रीचा प्रहर चालू होता ....
तू म्हणत होतास ....
"चंद्र नसताना...चांदण खूपच जास्त ....
जाणवत नाही का ? व .. सुंदरही दिसत .."
कस सांगू तुला .....??.
"पुरीयेतले कोमल सूर
वर्ज्य केल्यानंतरसुद्धा
तीव्र स्वरांमध्ये .....
बागेश्री अधिक सुरात येते ....
निरंजनातल तेल संपताना
दिवा जास्त उजळून निघतो ....
कारण ....
जाणार सुख दुख जरूर देवून जात
शेवटी सुखाने दिलेलं ते दुख ...
ते त्याच्याएवढच भरजरी असत.....
गजरा नसतानादेखील ......
उरणाऱ्या त्या दोन कळ्याइतकं...."
6
पारिजातकाच्या झाडाखालच्या ....
त्या लाल लाल मातीवर ...
मी तुझ नाव लिहिलं होत ...
आणि तू ....
माझ्या गालावर टीचकी मारत....
नुस्सत हवेतल्या हवेत
तिथे माझ नाव गिरवत होतास ....
म्हणत होतास ........
"पाहूया कुणाच नाव जास्त राहत ...
ज्याच राहील ....त्याच जास्त प्रेम"
हे काय ? ....नख लागल तुझ मला ...
गालावर रक्त ....रक्ताचा ओघळ ....
मी वेड्यासारखी ओरडत होते
"मी जिंकले ...मी जिंकले ...."
आणि तू म्हणत होतास .....
"अग ...किती लागल तुला ...
I am very Sorry....आता
घरी कशी जाणार तू ....
घरचे काय म्हणतील तुला ?"
7
तुझी वाट पाहता पाहता
तुझचं वाक्य घोळवत होते ....
"आज जरा उशीरा येईन हं "
झाडावरून एक टपोरा थेंब
गालावर पडला ....पाउस आला
पण समोर हे काय ...इंद्रधनुष्य ..
"इंद्रधनुष्य आल कि पाऊस नाही येत "
आता मग ??
पायाखालच्या जमिनीने ....आज ...
फक्त वाऱ्याचा खेळ सोसला होता ...
पाऊस तर येणारच न्हवता ...
आता तिने पाहायचं फक्त ...
दूर दूर उधळलेल्या रंगाची उधळण ...
काळे ढग ....पांढरे ढग ....
ढगांचे चित्रविचित्र आकार ...
इंद्रधनुष्याचे रंगीत हुंकार ...
सुंदर स्वप्नांची सुंदर राख
अस्ताचा सूर्य गाठणारी आग
छे काहीतरीच आग कुठे?
क्षितिजावर उठलेल मृगजळ ...
आणि विजांनी कातरलेल आभाळ ..
विजा विजा ?? कश्या आल्या ??
बापरे अंधार झाला ....
.....शेवटी तू आज आलाच नाहीस
8
मी रडत होते ...
"का नाही आलास काल ?
मी नाही बोलणार तुझ्याशी "
तू स्फुंदत होतास ...
"अग ऐक तर खर
अचानक पाहुणे कुणीतरी ....
एका मुलीचे वडील ...
त्यांच्या मुलीसाठी मला .....
...........अग ....अग .......
वेडी आहेस का .....??
अस कस करेन मी ??
तुझा हात माझ्या हातात होता ...
वाटलं आभाळ मुठीत येवून ...
तस्सच थांबल आहे ....हम्म
पण आजही ....समोर ...
कालचे..... इंद्रधनुष्य ...
आणि पायाखाली जमीन ...
उन्हानेने रापलेली ......??
आज कोणता खेळ होता ?
9
वाढदिवसाच... चाफ्याच फुल ...
हातामध्ये ....तोरणं ...तोरणं
लहडलेल्या बांगड्यांची ....
कानातले डूल ....झोके घेणारे ...
ओळखीचा ...सुगंधी दरवळ ...
मोगऱ्याचा....गजरयाचा.....
आणि हाताला थंडगार स्पर्श ...
एका काचेचा...... आणि
तुझा आवाज ..."हम्म गिफ्ट "
गिफ्ट ......काचेची दोन कबुतर ...
नाही नाही ...कबुतर नाही
एक बुलबुल होती गाणारी ...
स्तब्ध ...शांत ...झाडावर बसलेली
तिला पंखाच्या छायेत घेणारे ....
पंख पसरलेलं ....कबुतर ....
नाही नाही ....दूर दूर उडून जाणार .....
दूर जाणार कबुतर .....
10
मनाला आधार
बंधनाची काटेरी तार
डोळाभर पाणी ...
कुण्या काळजाची कहाणी
चांदण्याचा शृंगार
सावलीने पहुडलेला अंधार .
तुझी माझी भेट
पारिजातकाच फुलांच बेट...
वेळ अशी कातर
तुझ्या माझ्यातले अंतर
सुखातल दुख
दुखातल सुख .....
टेकलेल सूर्यबिंब ...
स्वल्पविराम कि पूर्णविराम ...
नक्की काय आहे हे सार ......?
सार काही समजण्या पलीकडच ...
सारच ....तू ....मी ....आपल प्रेम ......
आणि तू गदागदा हलवून मला
विचारत होतास .....
"सांग ना राणी .....
माझ्याकडे नेहमी धागा ....
आणि तुझ्याकडे कळ्या अस का..?.
आणि फुल तर खाली सांडून जातात "
11
झेंडूच्या वास नसलेल्या
फुलावर बसलेलं फुलपाखरू ...
पण तरीही आनंदात होत .....
आणि गवताच्या पानावर
असलेला दवबिंदू .....
कदाचित पुढच्या क्षणी ...
मातीत विरून जाईल सुद्धा ......
पण ........
दोन्हीमध्ये फारसा फरक
वाटत न्हवता .....
आणि तू मला विचारत होतास
"दोन्हीपैकी काय सुंदर आहे ?"
मी म्हणाले ....
"प्रेमात जगण आणि मरण तस
दोन्ही सारखंच.....
तो बघ तारा तुटला ........
कदाचित जगण मरण यापेक्षा
प्रेमात तुटण सुंदर दिसत ..."
12
तुझा खर्जातला आवाज .....
"काय झाल हम्म ?
एवढी निराश का ??
रोज काहीतरी चिवचिव करते .....
रात्री स्वप्नातून हटत नाही ....
......तुझा चेहरा .......
पापणीला स्वप्न टोचत
असल्याचा भास होतो ...आणि
तुझ्या अबोल आसवांचा ...
...आवाज ...आवाज ...येतो ....."
तुला बिलगून मी हुंदकत होते ...
कंठातून शब्द येत न्हवते ....
"त्या मुलीचे वडील ....
तू ....तुझ लग्न ........
ते इंद्रधनुष्य ....ते कबुतर ...."
तू फक्त नकारार्थी .....
...........मान हलवत होता
तुझ्या डोळ्यातून पाणी ...
ठप्प ....ठप्प ....ठप्प ....
गालावरची नखाची जखम
खपली उडाली होती .....
....त्यावर तुझी आसवे ...
जखम चुरचुरत ....होती ....
"दुखाचे अश्रू खारट असतात ना??
13
आज आभाळ कस मोकळ होत ....
एकदम मोकळ .....मोकळ .....
ढगांचा धूर न्हवता .....की....
मंदिरातल्या घंटेचा सूर न्हवता ....
धुळीची ....पावले न्हवती ....की
संधीप्रकाला चाहूल न्हवती .....
सप्तऋषी तारकेतली ...
अरुंधती आणि वशीष्ठ .......
फक्त ...हळू हळू ....तेजाळत होते ...
सार काही मंद ....मंद ...मंद ...
गजबजत होते ..... फक्त माझे प्रश्न .
..........प्रश्न आणि प्रश्न ..........
माझे प्रश्न आणि तुझी उत्तर ....
"तू म्हणजे ?.....' मी '
मी म्हणजे ?.......'तू'
तू मी म्हणजे ?.......'आपल नात'
नात म्हणजे ? .....'प्रेम' .....
प्रेम म्हणजे? ....'विश्वास' ....
विश्वास म्हणजे ....?
.........'देवाच्या पायावरच फुल'
फुल म्हणजे......?
सुंदर सुंदर हास्य कळ्यांचे
कळी म्हणजे ....?"
तुझा वैतागलेला आवाज ?
किती हे प्रश्न ......?
आणि मी म्हणत होते ....
"काय करू माझ्याकडे फक्त
प्रश्न आहेत ...आणि तुझ्याकडे ....
फक्त ....फक्त ....उत्तर ........
हातातल्या कळ्या तस्शाच
अनुत्तरीत ... अनुत्तरीत.... "
14
पारिजातकाच्या झाडाला ....
.....टेकून उभा होतास .......
नेहमी मी उभी राहायचे
पण आज तू .....आणि ....
माझ वाक्य म्हणलास ...
"काय हे कित्ती कित्ती उशीर ?"
हम्म घ्या ....गजरा ...घ्या ...."
रोजचा खेळ .....आता तर ...
पारीजातकाला पण...मोगरा ...
.....आवडायचा ....हं..खरच ....
हे काय झाले ....
गजरयातली सगळीच फुल ...
...सांडून गेली ...सांडून गेली ...
हातात कळी न्हवती ...माझ्या ...
आणि धागा ...गजरयातला....
तुटला ...अस कस झाल ?
मी भांबावलेल्या स्वरात बोलले ...
"तू मोगरा समजून जुईचा गजरा
....आणलास .....जुईचा ...गजरा ...."
तू ....मी ....आणि .....आपल्या
दोघांमध्ये सांडलेली जुईची फुल ......
15
चिमुकल्या संसारांची ....
.....चिमुकली स्वप्न .....आणि...
तू ...मी .....रेखलेले ....
उंचच ...उंच ...कल्पनाचे मनोरे ....
छोटस घर ....कौलारू घर ...
कौलारुच ..त्यातून कवडसे येतात ....
अग्गदी चांदण्यासारखे दिसणारे
घराला चारच खांब ....
...लाकडाचे हं....लोखंडाचे नको ...
काळी काळी ...थंडगार फारशी ...
छोटस अंगण ...
अंगणात ...तुळशी वृंदावन ...
मोगऱ्याचा ताटवा....आणि ...
हा असा पारीजात पण हवा ....
पण मी बुलबुल ....काळी काळी ...
.......सुरांना...आळवणारी .......
आणि तू ...पांढराशुभ्र कबुतर ....
....शांततेच प्रतिक ......
"आपल्या घरातून परवानगी...
......कस व्हायचं ...काय करायचं ?"
मी तुला नको असणारा प्रश्न
विचारला होता ......
तू ताडकन उठून दूर गेलास ....
मैलभर पसरलेलं ....उजाड माळरान
उभारलेला पारिजात ...आणि ...
......एकटीच शांत बसलेली मी
16
सूर्याचा प्रकाश अडवून
किती पाखर ये जा करत होती .....
पानाची सावली ...
वाऱ्याने हलत होती ....
कवडसे चिरत होती ....
कसली हि अनामिक हुरहूर .....
कुठल्या काळच्या....
निराशेने कवाड खोलल होत ......
माहित नाही ....माहित नाही ....
नक्की काय ...होत .....
आत या मनाच्या गाभाऱ्यात....
इतक्यात तुझा आवाज .....
वाटले या अंधारी तळघरात ....
काहीतरी ओळखीचे आहे ...
"हम्म राणी गजरा ....
बर झाल लवकर आलीस ....
नाही ....वेळ नाही ...
दवाखाना ....बाबांना Heart Attack...
......तिथूनच येतो आहे ....
चल ...मी जातो ....."
माझ्या तोंडात शब्द विरून गेले
"अरे जातो नाही ,'येतो' म्हणाव"
17
तुझी दूरवर येणारी ....आकृती ....
मी धावत येवून तुला मिठी
मारणार इतक्यात तू बोललास ....
"थांब तिथेच ...तिथेच .....
पुढे नको येवू ...आधी ऐक .."
तू एकटाच बडबडत होता ....
.
"राणी लग्न ठरलं माझ ....
बाबाच आयुष्य ......डॉक्टर ....
वेळ नाही जास्त ....जास्त ....
तू बुलबुल ....मी कबुतर ....
कस कस सांगायचं ....बाबांना ...
घरी ....Tension ...Tension....
आपल्याबद्दल ....तू मी ...आपण ..
नाही थांबलो ...तू तुझ प्रेम ..."
आज एकही अश्रू खळला नाही
तू उन्हात होतास ....
आणि मी सावलीत ...पारिजाताच्या ....
जीवात जीव न्हवता .......
....हृदय पोखरून ....निघत होत .....
पण आज भीती नाही वाटली ...
काळजी वाटली ....फक्त .....
उन्हाच्या तिरपीची....आणि तुझी ....
जे मागितलं होतंस ते तुझ न्हवत ...
आणि मिळालेलं पण ....
.........तुझ न्हवत .....तुझ न्हवत
फक्त काळजी वाटली तुझी ........
18
आज पण आले आहे .....
पारिजातकाच्या झाडाजवळ मी ....
काल जस्स होत तस्सच आहे सार ....
फक्त तू नाहीस ....बाकी सार आहे ....
स्वर्गातून शाप घेवून .....
आलेला....पारिजात ....पारिजात ....
आपल्या प्रेमाचा दरवळ ...
परीजाताकामध्ये हरवलेला .....
मोगरा .....गजऱ्याचा धागा .....
आपली सुंगंधी प्रेमकथा ....
अमरप्रेम ....अमरप्रेम .......
तू काल ओठावर दिलेलं ....
फुल ...निरोपाच ....वाळलेलं ...
शांत झोपलेली मी ....आणि ...
बोटात चिमटीत कुसकरलेल्या ...
"दोन गजरयातील कळ्या...."
-------कविता मोकाशी
No comments:
Post a Comment