Pages

Tuesday, 29 July 2014

वारूळ

मनी उन्मनी जागणारे स्वप्न 
स्वप्नांचा चुरगाळलेला कागद 
कागदाचे ओरिगामी पक्षी 
पक्षी गातात झाडावर गाणे 
गाण्यातून ओहोळतो पाऊस 
पावसातून निथळते कथा 

विव्हळत राहते दुख 
दुखाला नाही नाद हुंकार 
कोसळता गंध रंग उजेडाचा 
थरथरत्या सावल्यांचे भय 
निजत्या अस्पर्शाच्या वेली 

काळाची निद्रागुंफा 
अजानुबाहू रेखाचित्रे 
जन्मखुणाची अबोध नक्षी 
नक्षीतले हिरवे गोंदण 
गतजन्मीचा वंचित उःशाप 

पहाडावर भग्न मंदिर 
पायथ्याशी आर्त वेदना 
वेदनेस तहान भूक तहान 
अश्रुंचे निळे गंभीर विवर 
विवरामध्ये खोल खोल 
हृदयाची व्याकूळता

एकटेपणाचे अंकुर 
एकटेपणाचे अबोल झाड 
ना सावल्या ना कवडसे 
पानात जळते झाड 
आगीत पेटल्याविना 

समुद्राच्या तळाशी 
हरवलेला शंख
समुद्राची गाज 
शब्दांच्या लाटेवर 
असंख्य परीघ 
न ओलांडता येणाऱ्या शपथा  
काजळडबीला लाव तीट 
महाकाव्याची दीर्घ मोहिनी 
चित्रातले शिल्प 
कळते आकळते 
सजीव संजीवन 
चिरंतन समाधी 
समुद्राच्या तळाशी 
हरवलेला शंख

श्वासभरुनी देह 
देहाची थडगी 
थडग्यात बसून  
आठवणींचे सावळे रूप 
ध्यानस्थ मौनस्थ 
फासून रक्षा अंगाला 
अंगाभोवती 
थडग्याचे वारूळ 


-----कविता 

thinking of you

thinking of you 



Windows closed
Tree was alone 
I closed my eyes 
Dreams never died
Clouds of mind
mist of breathing
...I am thinking of you 

Warer was changing
Twilight to dark 
Sorrows unknown
Happiness anonymous
Stars were falling down
I don't wish anything
...I am thinking of you

We walked together
Town has lighten up
Candles melted slowly
Radio turned on
Songs were delicating
To dearest one
Silent blue waves
Touched to heart
...I am thinking of you

You holded my hand
Eyes were closer to eyes
There was no life
Swing is in air
Sky was beneath
You me and Skyline
...I am thinking of you

----Kavita

दिवेलागण

दिवेलागण 


तुझ्या घरी दिवेलागण 
माझ्या अंगणात सरी 
भेटावयास कशी येऊ ?
देऊळाच्या माथ्यावरी 

गाव राहिला मागे ओस 
तू पसरुनी अनंताचे बाहु 
नदी नाले ओहोळ तरले   
तुजवीण मी कैसे राहू ?


-----कविता 

बर्फ-लोणी

बर्फ-लोणी


रुईचा तारा लखलख 
निळेशार आकाश पाणी 
गाभारयात रुद्राचा घोष 
ओघळते चांदीचे पाणी 

सागरात डुंबला ऐरावत
पर्वतलाटा दुधाळ खेळ  
गोकुळात नांदे कान्हा 
बर्फ-लोणीचा स्नेह मेळ   

रंध्रात ओळखीचा ऋतू 
राजहंसाचे नुरले भान 
नक्षत्रांचे शुभ्र सरोवर 
ब्रम्हलीलेस ये उधाण 

कापुराची झांज आरती 
धवल झाली कृष्णमाया  
काळ गोठला काळ लोटला 
पावसाठायी तिन्ही छाया 


-----कविता 

Wednesday, 23 July 2014

बुटकी माणसे

बुटकी माणसे 



बुटक्या माणसाची उंच घरे 
घरापुढे चित्रांचे फलक 

बुटक्या माणसाचा देह 
जिवंत वा मृत 
गाडलेली संस्कृती 
उकरलेली मढी 
रंग आणि माती 
कैवल्य स्वरूप 

कोसळणाऱ्या पावसात 
कागदाची होडी 
बुटकी माणसे पैलथडी 
पाण्याच्या अंगात 
पाण्याच्या रंगात 


----कविता 

तुझे डोळे

तुझे डोळे 


कोंदले आकाश 
जडिला माणिक 
काळोख रातमणी 
तुझे डोळे 

भेटीलागे भेट 
तृप्तीलागी तृप्त
समाधानी पूर्ण 
तुझे डोळे 

करुणेचे द्वीप 
वेदनेचे दीप 
एकाएकी एक 
तुझे डोळे  

शब्दाचे कंकण 
किणकिण नुपूर 
अर्थाअर्थी मंजुळ 
तुझे डोळे 

स्फुरते न काही 
कळते न काही 
उरते न काही 
तुझे डोळे 

स्पर्शातीत तन 
भासातीत मन 
श्वासातीत क्षण 
तुझे डोळे 

दृश्य अदृश्य 
काळाचा बोध 
परी अबोध 
तुझे डोळे 

ओळखीचे मौन 
मी दृष्टीहीन 
पाहते अधीन  
तुझे डोळे 



-----कविता 

पावसाच्या संध्याकाळी

पावसाच्या संध्याकाळी 



पावसाच्या संध्याकाळी 
अस्तमान डोईवर असताना 

ओसरीवर लावावा दिवा 
मालवू नये अंगणातले फुल 

डोळ्यांवर बांधावी पट्टी 
सावलीत बांधू नये घर 

आखावी क्षितिजाची रेघ 
मिठीत घेऊ नये भास 

गुणगुणावी पाऊल धून 
शोधू नये ऐल पैल तीर 

ऐकावी कुंद हवेची गाणी 
ऐकू नये कोकिळेचे मौन 

लिहावा निराशेचा निर्मळस्कंध 
वाचू नये पडवीत प्रेमकथा 

पावसाच्या संध्याकाळी 
अस्तमान डोईवर असताना 
भिजावे एकटेच एकटेपणात 
पाण्याने भरलेला घट घेवून 



-----कविता 

प्राचीन आणि अरण्य

प्राचीन ,अरण्य ,बोध उच्चार 



1

प्राचीन


पुरियाचे मावळते उन 
खूप खूप जुने 
भग्न मंदिराच्या गाभाऱ्यात 
तू मी 
तितकेच प्राचीन 
प्रतीकापलीकडील सृष्टीतले


2

अरण्य


युगामागून युगे 

अरण्यामागून अरण्य
निळा प्रकाश 
देहभर 

आकाशाची माती 
चांदण्याचा दगड 
अंतरंगाच्या भूलीत 
बोध -अबोध 


3


बोध 

नक्षीतले फुल 
किती लोभस गोंडस 
नाही गंध रंग 
नाही विषबाधा 
परी चेतन म्हणविते 
या उदास बोधा 


4

उच्चार 


निराधार वाटा ओळखीचे झाड 
अबोल पानांतले आकाश 
कुणासही नाही भाषेचा परियच 
ध्यानस्थ बैसला समुद्र जसा 
तसे चालले मंत्राचे उच्चार 


------कविता