Pages

Monday, 17 February 2014

अदृश्यता



काळोखाची समीपता बदलते आहे
अंतरंगाची सुलज्जता
रंग नाही या आभासाच्या फुलांना

निसटल्या आहेत वाळूच्या स्पंदनरेखा 
ढळताना श्रुंगाराचे पदर
मोह नाही या शून्यातल्या क्षणाला

एकाकार तदाकार
तुझी अदृश्यता
माझ्या संवेदन जगण्याशी
-तुझ्याशी !!

----कविता 

No comments:

Post a Comment