सूर्याचे पठार
जीव जन्म उन्हात वाया
रौरव काळीज विखार डोंगर
अश्रुंचे ठिगळ असेही सुंदर
तीर तवंग जुना पाठलाग
मृगजळाचे अनंत भाग
पोकळ पारंबी कोरडे हुंकार
फुटके वादय तुटका संचार
आळोखेपिळोखे वेटोळा गुंफण
पोटाशी भूक बांधते भिल्लीण
सावलीत सावली करुण कोप
रामास वनवास धाडीला निरोप
नाचती म्हणे परिस्थितीचे दैत्य
पृथ्वीवर पुन्हा अवतरते सत्य
ठणकते सत्य शुष्क प्रहार
तेजाचे वाळवंट सूर्याचे पठार
.
.
.
.
गबाळग्रंथी उनाड माया
जीव जन्म उन्हात वाया
-----कविता
No comments:
Post a Comment