Pages

Monday, 26 August 2013

मातृत्व

मातृत्व


काजव्यांनी मातले अंधारानी पातले
उश्याशी बाई डोईजड दगड

कमरेला नाणी भिंतीवर गुणी
पायथ्याशी वीट सोन्याहून मऊ

मानेवर जू आकाशात भू
गर्भात फुलते अथांग अंतराळ

आसुतले हसू हसुतले आसू
गूढ जाणीव कथा कवितेची

पाठीवर चूल वक्षावर फुल
तुझ्या पोटात तुझा गोळा



-----कविता

No comments:

Post a Comment