Pages

Monday, 26 August 2013

मृगजळ वनवास आणि तृष्णा

मृगजळ वनवास आणि तृष्णा

विजेचे कवच संध्येचे कुंडल
बाळ तान्हा पाण्यावरी

आकाशी वाळवंट जमीनी मृगजळ
चांदण्यात कोटीसूर्य तरंगती

उदय अस्त आसावले चक्र
धगधगतो सूर्य अंतरी वेदनेच्या

----------------------------------------
सांडला पारिजात वाढला अश्वत्थ
संन्यासपण जागे अंगणात

भोग वनवास त्याग वनवास
तांदळाचे धुण वाळले दुधावरी

खोप नशिबी वैराग्य भरते         
विव्हळतो आत्मा चिरंजीव
---------------------------------

बोबडे बोल उसवितो हुंदके  
हळहळतो पान्हा देवकीचा

व्याकुळ तृष्णा करुण बासरी
यमुनेचा काठ भिजत नाही

कल्लोळ प्रेमात सरती आसवे  
दयाघन रमतो एकएकटे 
-------------------------------


------कविता

कर्ण अश्वथामा आणि कृष्ण यांच्या बालपणात काहीतरी विलक्षण साम्य वाटते मला ते काही असे 

No comments:

Post a Comment