निद्रेच्या अतुट ज्वालेतून विझलेला अंधार
निळ्या गर्द आभासी क्षणाच्या लहरीतुन
नर्मदेच्या तटकिनारयावर
शुभ्र चंचल जळाच्या तरंगावर
बुडवीत आहे खोल धुंदमग्न अंतरंग
पळसाच्या पानातुन सांद्र होणारी चंद्ररश्मी
सांधते आहे माझ्याशी अनुसंधान
अभिलाषेचे अनासक्त बिंदू अवकाशभरुन
प्रवासीत आहेत अनंत यात्रा
पुर्णत्वातुन पुर्णत्वाकडे तेच ब्रम्हसुत्र
उलगडते आहे पाव्यातुन तुझ्या ओठावर
-----कविता
निळ्या गर्द आभासी क्षणाच्या लहरीतुन
नर्मदेच्या तटकिनारयावर
शुभ्र चंचल जळाच्या तरंगावर
बुडवीत आहे खोल धुंदमग्न अंतरंग
पळसाच्या पानातुन सांद्र होणारी चंद्ररश्मी
सांधते आहे माझ्याशी अनुसंधान
अभिलाषेचे अनासक्त बिंदू अवकाशभरुन
प्रवासीत आहेत अनंत यात्रा
पुर्णत्वातुन पुर्णत्वाकडे तेच ब्रम्हसुत्र
उलगडते आहे पाव्यातुन तुझ्या ओठावर
-----कविता
No comments:
Post a Comment