Pages

Wednesday, 23 July 2014

तुझे डोळे

तुझे डोळे 


कोंदले आकाश 
जडिला माणिक 
काळोख रातमणी 
तुझे डोळे 

भेटीलागे भेट 
तृप्तीलागी तृप्त
समाधानी पूर्ण 
तुझे डोळे 

करुणेचे द्वीप 
वेदनेचे दीप 
एकाएकी एक 
तुझे डोळे  

शब्दाचे कंकण 
किणकिण नुपूर 
अर्थाअर्थी मंजुळ 
तुझे डोळे 

स्फुरते न काही 
कळते न काही 
उरते न काही 
तुझे डोळे 

स्पर्शातीत तन 
भासातीत मन 
श्वासातीत क्षण 
तुझे डोळे 

दृश्य अदृश्य 
काळाचा बोध 
परी अबोध 
तुझे डोळे 

ओळखीचे मौन 
मी दृष्टीहीन 
पाहते अधीन  
तुझे डोळे 



-----कविता 

No comments:

Post a Comment