पावसाच्या संध्याकाळी
पावसाच्या संध्याकाळी
अस्तमान डोईवर असताना
ओसरीवर लावावा दिवा
मालवू नये अंगणातले फुल
डोळ्यांवर बांधावी पट्टी
सावलीत बांधू नये घर
आखावी क्षितिजाची रेघ
मिठीत घेऊ नये भास
गुणगुणावी पाऊल धून
शोधू नये ऐल पैल तीर
ऐकावी कुंद हवेची गाणी
ऐकू नये कोकिळेचे मौन
लिहावा निराशेचा निर्मळस्कंध
वाचू नये पडवीत प्रेमकथा
पावसाच्या संध्याकाळी
अस्तमान डोईवर असताना
भिजावे एकटेच एकटेपणात
पाण्याने भरलेला घट घेवून
-----कविता
No comments:
Post a Comment