Pages

Wednesday, 23 July 2014

प्राचीन आणि अरण्य

प्राचीन ,अरण्य ,बोध उच्चार 



1

प्राचीन


पुरियाचे मावळते उन 
खूप खूप जुने 
भग्न मंदिराच्या गाभाऱ्यात 
तू मी 
तितकेच प्राचीन 
प्रतीकापलीकडील सृष्टीतले


2

अरण्य


युगामागून युगे 

अरण्यामागून अरण्य
निळा प्रकाश 
देहभर 

आकाशाची माती 
चांदण्याचा दगड 
अंतरंगाच्या भूलीत 
बोध -अबोध 


3


बोध 

नक्षीतले फुल 
किती लोभस गोंडस 
नाही गंध रंग 
नाही विषबाधा 
परी चेतन म्हणविते 
या उदास बोधा 


4

उच्चार 


निराधार वाटा ओळखीचे झाड 
अबोल पानांतले आकाश 
कुणासही नाही भाषेचा परियच 
ध्यानस्थ बैसला समुद्र जसा 
तसे चालले मंत्राचे उच्चार 


------कविता

No comments:

Post a Comment