अनारकली
नीतीच्या चौकटीनुसार
चौकट आणि भिंत राजमहालासही होती
नव्हता तो फक्त उंबरा
पायधुळीच्या बंधनाने
ओलांडला जाणारा
पण माझ्या पायात होती
घुंगराची बेडी
महालाच्या नीतीमत्तेनुसार
तरीही वेगळेच होते
त्या राजमहालात
उंबरयाच्या आतले जग
आणि बाहेरचे जग
न्यायाच्या कायद्यात
जखडलेल्या तुरुंगात
मी कारावासी झाले तिथे
कारण
देहापासुन आत्म्यापर्यँत
मुक्त करणारया प्रेमाने
बांधल होत मी मला
प्रेमगाथेचा गौरव
फक्त मृत्यूच करतो
हे ठाऊक होते मला
दार नसलेल्या भिंतीवर
ठोठावत राहिले
अंधाराला अंत नसतो
न्यायदानाच्या पुण्याने
भिंतीत गाडले
ते फक्त त्याचे आंधळेपण
अनारकली ओलांडते आहे
या काळोखापल्याडच्या
या काळोखापल्याडच्या
शापाच्या उजेडाला
राजमहालाचा नसलेला
उंबरा होऊन
कविता
No comments:
Post a Comment