भूक
मांडीवर डोक ठेवून निजले
ते निजूनच गेले
पाण्यावर सोडून दिले
काळजाचे दिवे ओघळणारे उन्ह
भेटणार नाहीत पुन्हा त्यांना
ओंजळीतली फुले वाटेतल्या सावल्या
डोळाभर पाण्याने तळवाभर स्पर्शाने
भागणार नाही काहीच
खूप खूप भूक लागली आहे प्रेमाची
मांडीवर डोक ठेवून निजले
ते निजूनच गेले
----कविता
मांडीवर डोक ठेवून निजले
ते निजूनच गेले
पाण्यावर सोडून दिले
काळजाचे दिवे ओघळणारे उन्ह
भेटणार नाहीत पुन्हा त्यांना
ओंजळीतली फुले वाटेतल्या सावल्या
डोळाभर पाण्याने तळवाभर स्पर्शाने
भागणार नाही काहीच
खूप खूप भूक लागली आहे प्रेमाची
मांडीवर डोक ठेवून निजले
ते निजूनच गेले
----कविता
No comments:
Post a Comment