रथोत्सव
रथ ओढती भक्त जन रथात बैसले देव
देव करील कृपा नांदेल समत्व बंधु भाव
रथावर सूर्याची नक्षी रथावर कीर्तिमुख
रथ चालिला पूर्वेकडे सूर्यास्त पश्चिममुख
रथापुढे अश्व गज रथापुढे मांडला खेळ
तलवार भाला खड्ग जमला शस्त्रमेळ
शस्त्रासहित शास्त्रे चालले स्वयं ब्रम्हादिक
खारकेचा वाटती प्रसाद हेचि सुख हेचि सुख
दक्ष शंकराचे युद्ध युद्धाची कारंथ करी नाटिका
रचले विश्व नारायणाने तशी रचली नाटिका
रथ थांबला आमुच्या दारी आले दारी शंकर
वैराग्य सुमने वाहु या जोडूनी संध्येचे कर
मात्यापित्यास सौख्य दे सौख्या दे अनुभूती
लाभू दे प्रज्ञा वाणीला खुंटू दे दीन हीन मती
रथ पोचला मंदिरी मंदिरात वाट पाहे नंदी
नाद गजर अनाहत गाऊ लागले शृंगी भृंगी
काळास भासती कष्ट मनामध्ये मन
काळाची झाली अदृश्य दोरी विसरले भान
रथ आहे देहअवस्था देहास श्रमविती श्रम
देव ध्यानस्थ रथात तैसे बोधे मनास मन
----कविता
No comments:
Post a Comment