Pages

Tuesday, 2 December 2014

अतीत

अतीत 



दुःखाचे काळोख पाणी 
वर लखलख चंद्रबिब मनाचे 
नीज ना येते तरूणीला 
गाते समुद्रास अंगाई 

काळाचे औषध शोधणारा वैद्य 
त्यासही ना झाले निदान 
तिच्या अमूर्त स्वयंभू दुःखाचे

ओघळणारी मन शिशिरपर्णे 
कुठल्याश्या भोळ्या आत्म्याची 
वाढलेली छाया शरीरे 
तिच्या वेदनेच्या गाण्यामधली 

तिने घेतली विष गिरकी 
तल्लीन मंत्र सुखाशी 
नीज आली तरूणीला 
समुद्र गातो अंगाई 

काळातीत मन मनातीत काळ 
दुःखाच्या करूण निद्रेत ती पाषाण 


----कविता

No comments:

Post a Comment