चरित्रकथा
गर्दीचे धुक्यासारखे झालेले विश्वप्राण
दिशांत मातीसारखे तुझे एकटेपण
नव्या चैत्र पालवीला येणारे युगादिपण
मन गोंदणाचे नित्य शाश्वत अनादिपण
चैतन्य मुरडलेले चिन्ह पाठी पोटामध्ये
खुणा नसणारे संचित पुनःजन्म घेणारे
आरंभ अंतापासुन चाललेली चरित्रकथा
ग्रंथाच्या पानावरचे संदर्भ तुझे संन्यस्था
---कविता
गर्दीचे धुक्यासारखे झालेले विश्वप्राण
दिशांत मातीसारखे तुझे एकटेपण
नव्या चैत्र पालवीला येणारे युगादिपण
मन गोंदणाचे नित्य शाश्वत अनादिपण
चैतन्य मुरडलेले चिन्ह पाठी पोटामध्ये
खुणा नसणारे संचित पुनःजन्म घेणारे
आरंभ अंतापासुन चाललेली चरित्रकथा
ग्रंथाच्या पानावरचे संदर्भ तुझे संन्यस्था
---कविता
No comments:
Post a Comment