Pages

Wednesday, 24 December 2014

नेणीव

नेणीव 


ती गायची तिच्या बोलीभाषेतील गाणी 
अर्थ उमजायचा नाही कोणालाही 
तिच्या गाण्यावर होता त्याचा प्रभाव
तो बहुचर्चित फरारी असणारा कैदी 

तिच्या प्रासादिक रचनांचा आशय
उमजला सैनिकी गणवेशांतील मनांना
तिच्या घरात आले शस्त्रधारी
तिला नव्हता माहीत त्याचा पत्ता
ती निव्वळ साकारतसे अभिव्यक्ती

कल्पनांची रोपटे आली होती दारात
तिच्या वेणीचे झाले होते त्याने सर्प
म्हणुन तळमळीने गातसे ती गाणे
कुठलीच दुःख वेदना नव्हती मनात

तिला ना परिचित त्याच्या नजरेचा दंश
ना संवेद त्याच्या वासनांचे नाचरे मोर
त्याच्या पाठीवरचा ना वेचला होता वारा
त्याच्या छातीवर ना टेकले होते कपाळ

कधी एकदाच गेली होती त्याच्या दारा
खेळायला आणले होते सागरगोटे
दगडाचे बीज झाले तिच्या स्पर्शाने
आले वात्सल्य तिच्या ह्रुदयामध्ये
तिने सांभाळली रोपटी नाकळतेपणे

दिला तिने सैनिकांना त्याचा पत्ता
उडी मारली दारामागच्या विहरीत
कुणी सांगितलेली त्याची मरण वार्ता
खोटीच वाटायची इतके दिवस तिला

------कविता

No comments:

Post a Comment