Pages

Wednesday, 24 December 2014

फुलांचे चित्र

फुलाच्या चित्रांवर जमली आहेत फुलपाखरे
मध गोळा करण्यासाठी
फुले जिवंत नाहीत ठाऊक नाही चित्राला
फुलपाखरांच्या प्रेतांनाही हाकारते बिचारे
या चित्राला कुणी केले आहे सजीव ?
माझ्या डोळ्यांची कधीच झाली आहेत फुलपाखरे
हे फुलांचे चित्र मला आंधळीला का दिसते !

-----कविता 

No comments:

Post a Comment