Pages

Tuesday, 2 December 2014

अंत

अंत 


ह्रुदयाची जमीन होते तेव्हा 
करुणेने भारलेले रिकामे आकाश 
उदय अस्त मावळलेल्या 
क्षितीजावर जन्म घेते 
तुझ्या श्वासांची पावले 
अशावेळी चालत यावीत 
ह्लुदय झालेल्या जमीनीवरून 

सतेज वाळवंटात रखरखणारे सत्य 
बोचर्या जीवाला आधार देणारे 
तुझे वनवासाचे विशाल रोपटे 
म्रुगजळाच्या धगीत खुरटून जावे 
माझ्या सावलीचा उंट तहानतो
या वेड्या स्वप्नांच्या अधेमधे 

मातीचे मरण जीवानिशी कुरवाळले 
तिच्या व्यथातुन माझा दुःखाचा जन्म 
तिच्यानंतर माझे शब्द अवकाश होऊन 
नक्षत्रांचा युगाचा प्रवास पाहणारे
माझे अ-मन मातीच्याच अंतात 

---कविता

No comments:

Post a Comment