अचेतन
शुद्ध एकटेपण ना हेतू ना बीज
सापडत नाही कोणता खडक
उन्हाला माथा टेकवण्यासाठी
हातातले दैन्याचे दंड आपटीत
वस्त्रावर वस्त्र परिधान करीत
झोळी भरते फकीर दिशांची
सृष्टी तोलून धरते समत्व
उन्हाचे तान्हे उनपण
उदास भाबड्या वैराग्यात
डोळ्यांना सहन होत नाही
परकायेने अंतरी रोपवलेला
माझा अचेतन आत्मयज्ञ
-----कविता
शुद्ध एकटेपण ना हेतू ना बीज
सापडत नाही कोणता खडक
उन्हाला माथा टेकवण्यासाठी
हातातले दैन्याचे दंड आपटीत
वस्त्रावर वस्त्र परिधान करीत
झोळी भरते फकीर दिशांची
सृष्टी तोलून धरते समत्व
उन्हाचे तान्हे उनपण
उदास भाबड्या वैराग्यात
डोळ्यांना सहन होत नाही
परकायेने अंतरी रोपवलेला
माझा अचेतन आत्मयज्ञ
-----कविता
No comments:
Post a Comment