१
मन आणि नदी
एकमेकांच्या उपस्थितीत
एकमेक अनुपस्थित
रडणारे मन नदीकाठी
नदीला दुःख नाही कशाचे
नदीला प्रवाह दुःखाचा
मनाला नाही जन्म मृत्यु
मन दृश्य किंवा अदृश्य
२
नदीच्या पाण्यात पडलेले
आकाश
पाण्यातल्या आकाशाला
साद देणारे मनाचे चेहरे
नदीच्या पाण्यात
३
नदीवर चालणारे अनवाणी उन
मनाच्या रुक्ष वाळवंटी
मनाच्या रुक्षतेतच उगवते झाड
वाढते अथांग त्यातील रुक्षता
संन्यस्थ होऊन त्याज्य करते
स्वगृहाचा
माधुकरी मागत भटकत जाते
नदीच्या पाण्यावरून
४
कोसळणारा नागवा पाऊस
नदी आणि मनामध्ये अंधार
येथे कधीच उगवणार नाही
न मावळणारा ध्रुवीय सूर्य
मन पालथे पडले आहे
नदीच्या पाण्यात
नदी उलथली आहे दुस्तर
कृष्णाची कोवळी टाच
नदीला स्पर्श करती होईल
तेव्हा नदी मन शांत स्थिर
अहल्याच्या शिळेसमान
५
नदी आणि मनाला
जोडणारा अज्ञाताचा पूल
पुलावरून चालत जातो योगी
पुलापलीकडे आहे मंदिर
मंदिरात मूर्ती त्याच्या गर्भाची
त्याच्या जन्माआधीपासून
त्याच्या जन्मानंतरही तो गर्भ
शिवशंभू साक्ष त्याच्या गर्भाला
६
विश्वाच्या काळनदीत पोहणारे
असंख्य देहाची असंख्य मने
कुठल्या पैलतीराला पोहचतात ?
काळाच्या न संपणाऱ्या वर्तुळाच्या
मध्यभागी केंद्रस्थ बसलेले असते
असंख्य मनाचे प्रातिनिधिक मन
तेथे पोहोचतात मन असणारी शरीरे
विश्वाची काळनदी सोबत नेते
शरीराचे गर्त तिच्या भोवऱ्यामध्ये
मन उरते मागे ऐलपैल तीरापाशी
७
चाफ्याच्या झाडावरून
भावनांचे सर्प मरून गेले
मनाचा उगम तिथे झाला
मनाने मनाला जाणले
ऐकली भस्मासुर मोहिनी कथा
उष्ण मनाच्या मस्तकावर
पडला मोहत्या मनाचा हात
मनाचा तिथे शेवट झाला
मनाच्या शेवटी नदीचा उगम
काळाच्या शिरोभागी नदीचे मुख
नदी विस्तारली काळाच्या प्रवाहात
अतीत पतीत काळ लुप्त नदीमध्ये
तोच पुढे मन म्हणून जन्मला
८
नदीला देह नाही
वैश्विक सत्य तिच्या मनात
तिच्या मनापर्येंत पोहोचण्याच्या
देहाच्या अनंत वाटा
अनंत वाटांनी अनंत वाटेकरी
मागणारे हक्क तिच्या मनाचा
तिला मन नाही
या गृहीतकाचे सत्य
केवळ ठाऊक नदीला
९
मनामध्ये अगणित मन
मनाला जन्म देणारी मन
स्थलांतरित होणारी मन
शिरतात नदीच्या अंतरंगात
नदीकाठी उदय अस्त पावतात
प्राचीन अर्वाचीन संस्कृती
संस्कृतीचे वृक्ष आणि पाचोळा
झाकते नदीचे उघडे नेत्र
नेत्राआड नदीचे अंतरंग
अंतरंगात अगणित मन
मनाला जन्म देणारी मन
स्थलांतरित होणारी मन
१०
नदीकाठी वसले आहेत पाले
पाल्यात राहणाऱ्या स्त्रिया
नदीवरून भरतात पाण्याचे घट
एक गाव ओलांडून
दुसऱ्या गावात वसतात पाले
दुसऱ्या गावातील नदीवरून
स्त्रिया भरतात पाण्याचे घट
या स्त्रियांचे मन भासू लागते
अ-मन किंवा न-मन
समुद्र होणाऱ्या नदीसारखे
--------कविता मोकाशी
मन आणि नदी
एकमेकांच्या उपस्थितीत
एकमेक अनुपस्थित
रडणारे मन नदीकाठी
नदीला दुःख नाही कशाचे
नदीला प्रवाह दुःखाचा
मनाला नाही जन्म मृत्यु
मन दृश्य किंवा अदृश्य
२
नदीच्या पाण्यात पडलेले
आकाश
पाण्यातल्या आकाशाला
साद देणारे मनाचे चेहरे
नदीच्या पाण्यात
३
नदीवर चालणारे अनवाणी उन
मनाच्या रुक्ष वाळवंटी
मनाच्या रुक्षतेतच उगवते झाड
वाढते अथांग त्यातील रुक्षता
संन्यस्थ होऊन त्याज्य करते
स्वगृहाचा
माधुकरी मागत भटकत जाते
नदीच्या पाण्यावरून
४
कोसळणारा नागवा पाऊस
नदी आणि मनामध्ये अंधार
येथे कधीच उगवणार नाही
न मावळणारा ध्रुवीय सूर्य
मन पालथे पडले आहे
नदीच्या पाण्यात
नदी उलथली आहे दुस्तर
कृष्णाची कोवळी टाच
नदीला स्पर्श करती होईल
तेव्हा नदी मन शांत स्थिर
अहल्याच्या शिळेसमान
५
नदी आणि मनाला
जोडणारा अज्ञाताचा पूल
पुलावरून चालत जातो योगी
पुलापलीकडे आहे मंदिर
मंदिरात मूर्ती त्याच्या गर्भाची
त्याच्या जन्माआधीपासून
त्याच्या जन्मानंतरही तो गर्भ
शिवशंभू साक्ष त्याच्या गर्भाला
६
विश्वाच्या काळनदीत पोहणारे
असंख्य देहाची असंख्य मने
कुठल्या पैलतीराला पोहचतात ?
काळाच्या न संपणाऱ्या वर्तुळाच्या
मध्यभागी केंद्रस्थ बसलेले असते
असंख्य मनाचे प्रातिनिधिक मन
तेथे पोहोचतात मन असणारी शरीरे
विश्वाची काळनदी सोबत नेते
शरीराचे गर्त तिच्या भोवऱ्यामध्ये
मन उरते मागे ऐलपैल तीरापाशी
७
चाफ्याच्या झाडावरून
भावनांचे सर्प मरून गेले
मनाचा उगम तिथे झाला
मनाने मनाला जाणले
ऐकली भस्मासुर मोहिनी कथा
उष्ण मनाच्या मस्तकावर
पडला मोहत्या मनाचा हात
मनाचा तिथे शेवट झाला
मनाच्या शेवटी नदीचा उगम
काळाच्या शिरोभागी नदीचे मुख
नदी विस्तारली काळाच्या प्रवाहात
अतीत पतीत काळ लुप्त नदीमध्ये
तोच पुढे मन म्हणून जन्मला
८
नदीला देह नाही
वैश्विक सत्य तिच्या मनात
तिच्या मनापर्येंत पोहोचण्याच्या
देहाच्या अनंत वाटा
अनंत वाटांनी अनंत वाटेकरी
मागणारे हक्क तिच्या मनाचा
तिला मन नाही
या गृहीतकाचे सत्य
केवळ ठाऊक नदीला
९
मनामध्ये अगणित मन
मनाला जन्म देणारी मन
स्थलांतरित होणारी मन
शिरतात नदीच्या अंतरंगात
नदीकाठी उदय अस्त पावतात
प्राचीन अर्वाचीन संस्कृती
संस्कृतीचे वृक्ष आणि पाचोळा
झाकते नदीचे उघडे नेत्र
नेत्राआड नदीचे अंतरंग
अंतरंगात अगणित मन
मनाला जन्म देणारी मन
स्थलांतरित होणारी मन
१०
नदीकाठी वसले आहेत पाले
पाल्यात राहणाऱ्या स्त्रिया
नदीवरून भरतात पाण्याचे घट
एक गाव ओलांडून
दुसऱ्या गावात वसतात पाले
दुसऱ्या गावातील नदीवरून
स्त्रिया भरतात पाण्याचे घट
या स्त्रियांचे मन भासू लागते
अ-मन किंवा न-मन
समुद्र होणाऱ्या नदीसारखे
--------कविता मोकाशी
No comments:
Post a Comment