दुःखाच्या कल्पनेत
दुःखाच्या कल्पनेत गढून जाते
तरंगत येतात अज्ञात ठिकाणाहून कलेवरे
मी काठावर पोहोचत नाही
दूर काचेच्या खिडकीतून पाहते द्रुश्य
तरंगणारी प्रेते जिंवत होतात
धाव घेतात माझ्या घराशी
दारासमोरचा जुना प्रौढ व्रुक्ष
रक्षक होऊन अडवु पाहतो त्यांना
वारा होऊन मनामध्ये वास करणारा
निकटवर्ती काळ ; स्नेह जडतो त्याच्याशी
जिवंत झालेल्या प्रेतांची दुःखे मला जडतात
काळोखाच्या असंख्य बिंदुचा जणु मध्य
---कविता
दुःखाच्या कल्पनेत गढून जाते
तरंगत येतात अज्ञात ठिकाणाहून कलेवरे
मी काठावर पोहोचत नाही
दूर काचेच्या खिडकीतून पाहते द्रुश्य
तरंगणारी प्रेते जिंवत होतात
धाव घेतात माझ्या घराशी
दारासमोरचा जुना प्रौढ व्रुक्ष
रक्षक होऊन अडवु पाहतो त्यांना
वारा होऊन मनामध्ये वास करणारा
निकटवर्ती काळ ; स्नेह जडतो त्याच्याशी
जिवंत झालेल्या प्रेतांची दुःखे मला जडतात
काळोखाच्या असंख्य बिंदुचा जणु मध्य
---कविता
No comments:
Post a Comment