Pages

Tuesday, 2 December 2014

मनोदेवते

मनोदेवते



मनोदेवते ---
होकार नकाराच्या अन्वयात 
उत्खननात सापडते मला तुझी मूर्ती 
तुझे एक अंग सोन्याचे एक मातीचे 

मूर्तीला माहित नाहीत नकाराचे घुमट 
जिथून एकदा साद दिली की 
सातदा तीच ऐकू येते जन्मभर 
शुभ्र चुना लावल्या पडक्या मंदिरात 
मूर्तीला ठाऊक होकाराचे कळस 
कळसावर येऊन बसतात 
निरर्थक प्रश्न व्यथांचे कावळे 

गावाबाहेरचा पुजारी कौल लावतो 
होकाराचे ध्वज फडकतात अंबरात 
कळसावरचे कावळे उडून जातात 
शोधत होकाराची कळसहीन दिशा 

मनोदेवते --
तुझे एक अंग सोन्याचे एक मातीचे 
कळत नाही तुझा अन्वयार्थ मला


------कविता

No comments:

Post a Comment