Pages

Wednesday, 24 December 2014

अभिव्यक्ती गोंदण

अभिव्यक्ती गोंदण


अकाव्य झालेल्या जगण्याला
व्यापत नाहीत मुलभुत प्रश्न
उत्तरांची दिशा शोधणारे
मन अंतराळी दिव्याचे

अभिव्यक्तीचे हिरवे गोंदण
पडझड झाली पानांची
किंवा आले वैधव्य तरी
पुनर्जन्माचे भाकीत

दूरदूर दिसतात चिंचोळे रस्ते
काळाच्याही पडझडीतही न बदलेले
आकाशाकडे मार्गस्थ होणारे

---कविता

No comments:

Post a Comment