शुन्य आणि अंधार
बाहेर शून्य आत शून्य
दोही शून्याला जोडणाऱ्या रेषेवरून
चालत जातात बुटकी माणसे
पोकळ होणाऱ्या अंधाराकडे
पोकळ अंधार भरीव अंधार
दोही अंधारास जोडणारया क्षितीजावरून
चालत जातात आडदांड माणसे
नसलेल्या स्वतःच्या घराकडे
बुटकी माणसे आडदांड माणसे
दोघे भेटतात एकमेकांना
नियतीच्या हेतुपूर्वक खेळामध्ये
एकदाच आणि शेवटचे
बुटक्या माणसांची विरते स्मृती
आडदांड माणूस मरतो दूर कुठेतरी
शून्यातून अंधार अंधारातून शून्य
म्रुत नदीकाठी जळतात प्रेते
मेलेल्या डोंगरावर उगवतात झाडे
वठलेल्या झाडावर घरटे बांधतो पक्षी
सूर्य झडलेल्या पानात उगवतो दिवस
आडदांड माणसे होतात जिवंत
बुटक्या माणसाची जागृत होते स्मृती
पुन्हा घडणाऱ्या त्याच कथेसाठी
मात्र यावेळी कथेत बदल घटनेचा
अंतिमतेतून आदिमतेकडे जाण्याचा
बुटकी माणसे चालत जातात शून्याकडे
आडदांड माणसे जाऊ लागतात अंधाराकडे
-----कविता
बाहेर शून्य आत शून्य
दोही शून्याला जोडणाऱ्या रेषेवरून
चालत जातात बुटकी माणसे
पोकळ होणाऱ्या अंधाराकडे
पोकळ अंधार भरीव अंधार
दोही अंधारास जोडणारया क्षितीजावरून
चालत जातात आडदांड माणसे
नसलेल्या स्वतःच्या घराकडे
बुटकी माणसे आडदांड माणसे
दोघे भेटतात एकमेकांना
नियतीच्या हेतुपूर्वक खेळामध्ये
एकदाच आणि शेवटचे
बुटक्या माणसांची विरते स्मृती
आडदांड माणूस मरतो दूर कुठेतरी
शून्यातून अंधार अंधारातून शून्य
म्रुत नदीकाठी जळतात प्रेते
मेलेल्या डोंगरावर उगवतात झाडे
वठलेल्या झाडावर घरटे बांधतो पक्षी
सूर्य झडलेल्या पानात उगवतो दिवस
आडदांड माणसे होतात जिवंत
बुटक्या माणसाची जागृत होते स्मृती
पुन्हा घडणाऱ्या त्याच कथेसाठी
मात्र यावेळी कथेत बदल घटनेचा
अंतिमतेतून आदिमतेकडे जाण्याचा
बुटकी माणसे चालत जातात शून्याकडे
आडदांड माणसे जाऊ लागतात अंधाराकडे
-----कविता
No comments:
Post a Comment