वटवृक्ष
मी डेरेदार वटवृक्ष बहरलेला
फांदया पानातुनी मोहरलेला
पारब्यातुनी लोंबकळलेला
पण त्याचा ...
झाला एक निर्जीव सापळा
झंजावती वादळात झुंजला
दूर माळरानात दिसताच
वादळ ...
सावरले पिल्लांना
फांद्यातुनी लपलेल्या पानांना
बाळानो बाबाला घट्ट धरा
पाखरे माझी ...
होती काही कोवळी
होती काही पिकलेली
आनंदाने उद्या झडणार होती
वादळाने ....
त्यांची रात्र विझवली होती
सुसाट्याने वादळ आल
अन निघूनही गेल
मुक्या वेदनेने ....
सजली माझीच सावली
दुखाच्या सड्याने
पिल्ले सवेदनेने पाहू लागली
सळसळाट करुनी म्हणाली....
बाबा खूप लागल का हो
तुम्हाला ....
त्यांच्या प्रश्नाने अश्रूच गोठले
सावली देवून वडिलपण जपले
माझेच मला
आज आईपण उमजले .....
-----कविता
मी डेरेदार वटवृक्ष बहरलेला
फांदया पानातुनी मोहरलेला
पारब्यातुनी लोंबकळलेला
पण त्याचा ...
झाला एक निर्जीव सापळा
झंजावती वादळात झुंजला
दूर माळरानात दिसताच
वादळ ...
सावरले पिल्लांना
फांद्यातुनी लपलेल्या पानांना
बाळानो बाबाला घट्ट धरा
पाखरे माझी ...
होती काही कोवळी
होती काही पिकलेली
आनंदाने उद्या झडणार होती
वादळाने ....
त्यांची रात्र विझवली होती
सुसाट्याने वादळ आल
अन निघूनही गेल
मुक्या वेदनेने ....
सजली माझीच सावली
दुखाच्या सड्याने
पिल्ले सवेदनेने पाहू लागली
सळसळाट करुनी म्हणाली....
बाबा खूप लागल का हो
तुम्हाला ....
त्यांच्या प्रश्नाने अश्रूच गोठले
सावली देवून वडिलपण जपले
माझेच मला
आज आईपण उमजले .....
-----कविता
No comments:
Post a Comment