Pages

Monday, 16 July 2012

कल्पना

कल्पना 


पाहिली ज्या दिव्यात स्वप्ने 
तो दिवा होता विझूनी गेला 
भास होते हृदयात माझ्या की
श्वास अंतरी निजुनी गेला ??

असेच होते घडले सारे अन 
तसेच क्षणात संपुनी गेले 
आठवांच्या काळ्या काचा 
रिते रितेच आसवांचे पेले 

अशी कशी अखेरीस व्हावी 
माझ्या या वेदनांची वंचना 
स्वप्न वेगळे भास वेगळे 
प्रेम म्हणजे फक्त कल्पना 



----कविता

No comments:

Post a Comment