असेन मी
तुझ्या शब्दास मौन येता
हुंकारत जगेन मी
आवंढे गिळत व्यथांचे तुझे
तुझ्यासवे जगेन मी
शहारून येता वेदना तुझी
कुशीत ती घेईन मी
देत उब तिजला कवितेची
तुझ्यासवे जगेन मी
देवून पूर्णविराम सूर्य ढळता
चांदणे अनुस्वरेण मी
मोड़ता आकार होवूनी ठिपका
तुझ्यास्तव जगेन मी
नसेल संदेश कागदावरी काही
विदेही होत असेन मी
परी रिक्त पंक्तीत श्वास ठेवून
तुझ्यास्तव जगेन मी
फिरुनी घनाशय शब्द रुजताच
शब्दातुनी उमलेन मी
नसेल कदाचित ती कविता
पण .......
तुझ्यासवे असेन मी
तुझ्यासवे जगेन मी
-----कविता
तुझ्या शब्दास मौन येता
हुंकारत जगेन मी
आवंढे गिळत व्यथांचे तुझे
तुझ्यासवे जगेन मी
शहारून येता वेदना तुझी
कुशीत ती घेईन मी
देत उब तिजला कवितेची
तुझ्यासवे जगेन मी
देवून पूर्णविराम सूर्य ढळता
चांदणे अनुस्वरेण मी
मोड़ता आकार होवूनी ठिपका
तुझ्यास्तव जगेन मी
नसेल संदेश कागदावरी काही
विदेही होत असेन मी
परी रिक्त पंक्तीत श्वास ठेवून
तुझ्यास्तव जगेन मी
फिरुनी घनाशय शब्द रुजताच
शब्दातुनी उमलेन मी
नसेल कदाचित ती कविता
पण .......
तुझ्यासवे असेन मी
तुझ्यासवे जगेन मी
-----कविता
No comments:
Post a Comment