मला सुचेल कविता .....
अंगणी तुझ्या उभा शोभनीय शब्दतरू नवा
सळसळ करितो असा अक्षरपर्णातुनी गारवा
असे वाटते असे वाटते ....
चोरट्या तुझ्या कटाक्षातच
चोरुनी न्यावा शब्दाक्षरांचा कुजबुजता थवा
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
डोहात तुझ्या विलक्षण सुंदर काव्यकल्पना
लहर तरंगाची जागवितसे माझ्यात चेतना
असे वाटते असे वाटते .....
मोकळाले सोडता पाय डोही
ओलेत्या तळव्यास शब्द स्पर्शावा साजणा
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
नभी तुझ्या कागदाचे थोरले एवढे आकाश
विखुरतसे त्यावरी चांदण्याचे स्मित सुभाष
असे वाटते असे वाटते ....
वेचिता तुझ्या चांदण्यास
परडीत ठेवावे आकाशातले शब्द सावकाश
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
झरणीतुनी तुझ्या झरते सागराची ती निळाई
बेफाम लाट उचंबळता भावनेची होत उतराई
असे वाटते असे वाटते ....
रुधिरा ऐवजी हृदयी
धावावी तुझ्याच कवितेची नुसतीच शाई
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
नको तुझ्या माझ्यात लघु गुरु क्रम कोणता
अलंकार असावा प्रेमाचा अर्थ त्याचा जाणता
असे वाटते असे वाटते ....
तुझ्या माझ्यात शब्दही व्हावा मग नेणता
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
-----कविता
अंगणी तुझ्या उभा शोभनीय शब्दतरू नवा
सळसळ करितो असा अक्षरपर्णातुनी गारवा
असे वाटते असे वाटते ....
चोरट्या तुझ्या कटाक्षातच
चोरुनी न्यावा शब्दाक्षरांचा कुजबुजता थवा
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
डोहात तुझ्या विलक्षण सुंदर काव्यकल्पना
लहर तरंगाची जागवितसे माझ्यात चेतना
असे वाटते असे वाटते .....
मोकळाले सोडता पाय डोही
ओलेत्या तळव्यास शब्द स्पर्शावा साजणा
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
नभी तुझ्या कागदाचे थोरले एवढे आकाश
विखुरतसे त्यावरी चांदण्याचे स्मित सुभाष
असे वाटते असे वाटते ....
वेचिता तुझ्या चांदण्यास
परडीत ठेवावे आकाशातले शब्द सावकाश
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
झरणीतुनी तुझ्या झरते सागराची ती निळाई
बेफाम लाट उचंबळता भावनेची होत उतराई
असे वाटते असे वाटते ....
रुधिरा ऐवजी हृदयी
धावावी तुझ्याच कवितेची नुसतीच शाई
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
नको तुझ्या माझ्यात लघु गुरु क्रम कोणता
अलंकार असावा प्रेमाचा अर्थ त्याचा जाणता
असे वाटते असे वाटते ....
तुझ्या माझ्यात शब्दही व्हावा मग नेणता
.....हम्म मग सुचेल मला एखादी कविता
-----कविता
No comments:
Post a Comment