Pages

Friday, 13 July 2012

चांद हरवला

चांद हरवला

आभाळाच्या सुपातला
रुपया कुणी खर्चिला
चांद कसा हरवला
चांदण्या कुजबुजल्या

रोहिणीने पळवला
का सूर्याने ग गिळला
कुणी त्याला दडवला
चांदण्या कुजबुजल्या

महादेवाच्या कपाली
गिराजात्मकाच्या भाळी
नसे चंद्राची ग मौळी
चांदण्या कुजबुजल्या

ढगाआड न लपला
झाडाआड न झोपला
ऐन पोर्णिमे रुसला
चांदण्या कुजबुजल्या

नभीचा चांद दिसला
डोहात जावून भला
आपल्या रूपे दंगला
चांदण्या कशा हासल्या

-----कविता

No comments:

Post a Comment