तुटता तारा
हसणाऱ्या वेलीनो
गुणगुणरया भ्रमरानो
मंजूळ हास्य नका विसरू
तुटत्या ताऱ्याला
भेटीचे वचन नका मागू
अमृत सरितानो
खळखळनार्या निर्झरानो
दुखाचा भार नका वाहू
माझ्या आसवांना मोतीयाने
शिंपल्यात नका सजवू
मोहक चंद्रीकानो
टिपूर चांदण्यानो
एक क्षण नका ढळू
तुटत्या तारयाला
थांब नका म्हणू
चिरंजीव सुरानो
अमोघ शब्दानो
दर्दभर्या रागिणीने
आकाश नका पांघरू
मल्हार नका आळवू
----कविता
हसणाऱ्या वेलीनो
गुणगुणरया भ्रमरानो
मंजूळ हास्य नका विसरू
तुटत्या ताऱ्याला
भेटीचे वचन नका मागू
अमृत सरितानो
खळखळनार्या निर्झरानो
दुखाचा भार नका वाहू
माझ्या आसवांना मोतीयाने
शिंपल्यात नका सजवू
मोहक चंद्रीकानो
टिपूर चांदण्यानो
एक क्षण नका ढळू
तुटत्या तारयाला
थांब नका म्हणू
चिरंजीव सुरानो
अमोघ शब्दानो
दर्दभर्या रागिणीने
आकाश नका पांघरू
मल्हार नका आळवू
----कविता
No comments:
Post a Comment