सांज झाली
ऐकुनी हरीची धून
मुरलीत तृप्त कान
राधेस न उरे भान
सांज झाली
गावूनिया गवळण
आनंदुनी अकारण
राधेस न राहे जाण
सांज झाली
झळाळे सोने पानात
पक्षी जाय घरट्यात
राधा नसे जाणिवात
सांज झाली
घागर ती डोईवर
राहिलीच डोईवर
राधेस न वाटे भार
सांज झाली
-----कविता
ऐकुनी हरीची धून
मुरलीत तृप्त कान
राधेस न उरे भान
सांज झाली
गावूनिया गवळण
आनंदुनी अकारण
राधेस न राहे जाण
सांज झाली
झळाळे सोने पानात
पक्षी जाय घरट्यात
राधा नसे जाणिवात
सांज झाली
घागर ती डोईवर
राहिलीच डोईवर
राधेस न वाटे भार
सांज झाली
-----कविता
No comments:
Post a Comment