Pages

Friday, 13 July 2012

मी न माझी राहिले

मी न माझी राहिले

तुझ्यातून मी मला गाळूनी पाहिले
उणे असे काहीच कसे नाही राहिले

तुझ्यात मी मला जाळूनी पाहिले
पेटते निखारेही कसे विझून राहिले

तुझ्या स्वप्नात मी थोडेसे डोकावले
माझ्याच प्रतिमेला मी कसे धरले

रिक्त हृदयात तुझे नाव कोरून पाहिले
तुझ्याच वेडाने रिते होते ते राहिले

तुझे माझे असे काय आता ठेविले
मी न माझ्यात तू न तुझ्यात राहिले

-----.कविता

No comments:

Post a Comment