Pages

Sunday, 15 July 2012

तू न मी

तू न मी

तू फक्त नात मागत आहेस
धाग्यात विणलेल
मी फक्त प्रेम देत आहे
रेशीमाच्या वेदनेतल

तू फक्त बंधन मागत आहेस
दोन श्वासातल्या अंतरातल
मी फक्त स्पंदन देत आहे
तुझ्याच नावाच्या हृदयातल

तू फक्त वचन मागत आहे
आयुष्याच्या सोबतीच
मी फक्त मेढ रोवत आहे
तुझच आयुष्य बनण्याचं

तू फक्त सुख मागत आहे
दुखातून वेगळ
मी फक्त सुखच देत आहे
तुझ्यातून वेचलेल

तू फक्त स्वीकार मागत आहेस
अधिकाराच्या रूपातला
मी फक्त हुंकार देत आहे
तुझ्याच जाणीवेतला

तू फक्त शब्द देत आहेस
कवितेच्या ओळीतला
मी फक्त कविता होत आहे
शब्दाविण भावनेतली

----कविता

No comments:

Post a Comment