Pages

Monday, 16 July 2012

सुख दुःख

सुख दुःख 



भिरकावूनी दुःख दे 
दगडाचे व्हावेत पक्षी 
हृदय जे हृदयाचे 
नसे पाषाणास साक्षी 

सुखाला दुखात ऐसे 
तोलणे बरे न्हवे
सुख दुख दो वेगळे 
जीवनाचे दोर न्हवे 

येती पाहुणे सारखे 
येरझार होते घरी 
पडवीत सुख झोपे 
दुख गस्त घाले दारी 

जो जन्मतो जगी त्यास 
असे अंत कुठेतरी 
सुखास दुखाची आहे 
प्रसूती वेदना जरी 




---कविता

No comments:

Post a Comment