नंदादीप
त्याला ...
कुणीतरी जाळीत होत
अन तो ही जळत होता
हो जळतच होता
कारण ...
तेवण्यात त्यागाचा आनंद
पण जळण्यात...
त्याचा जीव उदास उदास
काळोखाचे होती भास
त्याला ...
वाऱ्याची झळ सोसेना
अंधाराची धग साहवेना
मनातील ...
काळी काळी काजळी
हसून त्याला जाळी
इतक्यात...
कुठूनसे दोन हात आले
आधाराचे हात ओले ओले
तो ...
हसला उजळला तेवला
तेवून नंदादीप झाला
हो नंदादिपच झाला
तो ...
निराशेने विझलेला
प्रकाशाने उजळला
त्याचा ...
उजेड कसा झळालला
आधाराने दिपला
तो ...
देवघरातील नंदादीप झाला
हो नंदादिपच झाला ....
----कविता
त्याला ...
कुणीतरी जाळीत होत
अन तो ही जळत होता
हो जळतच होता
कारण ...
तेवण्यात त्यागाचा आनंद
पण जळण्यात...
त्याचा जीव उदास उदास
काळोखाचे होती भास
त्याला ...
वाऱ्याची झळ सोसेना
अंधाराची धग साहवेना
मनातील ...
काळी काळी काजळी
हसून त्याला जाळी
इतक्यात...
कुठूनसे दोन हात आले
आधाराचे हात ओले ओले
तो ...
हसला उजळला तेवला
तेवून नंदादीप झाला
हो नंदादिपच झाला
तो ...
निराशेने विझलेला
प्रकाशाने उजळला
त्याचा ...
उजेड कसा झळालला
आधाराने दिपला
तो ...
देवघरातील नंदादीप झाला
हो नंदादिपच झाला ....
----कविता
No comments:
Post a Comment