नकळत
आकाशाच्या प्रतलावर मांडिल्या होत्या काही रेषा
क्षितीज उडुनी गेले पाखरासवे पुसुनी माझ्या रेषा
.....तुझ्या माझ्या भेटीच क्षितीज अजून दूर आहे
तळहातावरी तुझ्या नावाच्या शोधिल्या काही रेषा
सुकुनी जायची मेहंदी कवळूनी घेताच तुझ्या रेषा
....तुझ्या माझ्या भेटीच क्षितीज अजून दूर आहे
चंद्राने पाण्यात तर सांडिल्या तरंगाच्या काही रेषा
आसवे निरोप देत घळता ओलेत्या पापणीच्या रेषा

सावध होत वारा पहातसे कळीच्या कोमल काही रेषा
नाजूक कळीच्या रंगाला चढल्या अनाम गंधाच्या रेषा
......माझ्या नकळत तुझी माझी भेट घडत आहे
-----कविता

No comments:
Post a Comment