उगम
अशाच एका कातरवेळी
निळ निलाळ आकाश
केशरी सोनकिरण घेवून
पैलतीराकडे चालत जात
सुर्यास्ताच टोक गाठत
गहिऱ्या विरक्तीच्या
भव्य सागरात बुडत अन
विश्वाकारात मिटून जात
...तिथेच माझ्या मनाचा उगम होतो
अशाच एका कातरवेळी
आभाळाच्या घुमटात
अनाकलनीय सूर येतो
हुरहूर लावीत वाऱ्याला
बासरीवर झंकारतो
शुभ्र मेघडंबरीवरून
कळस चढू लागतो अन
निराकार षडज हुंकारतो
...तिथेच माझ्या मनाचा उगम होतो
अशाच एका कातरवेळी
कविता खिन्न होते
पाचोळ्याच्या सावलीत
शब्दांना शोधू लागते
पापणीतल्या अंधारात
निशब्द होवून जाते
शब्दावाचून अनोळखी होते
...तिथेच माझ्या मनाचा उगम होतो
अशाच एका कातरवेळी
निराशेच कवाड उघडून
संध्याकाळ विरून जाते
पण आभाळच माझ्याशी
असणार नात तस्सच
दारापाशी ठेवून जाते
अन क्षणात ती निघून जाते
...तिथेच माझ्या मनाचा उगम होतो
-----कविता (अशीच एका कातरवेळातली )
अशाच एका कातरवेळी
निळ निलाळ आकाश
केशरी सोनकिरण घेवून
पैलतीराकडे चालत जात
सुर्यास्ताच टोक गाठत
गहिऱ्या विरक्तीच्या
भव्य सागरात बुडत अन
विश्वाकारात मिटून जात
...तिथेच माझ्या मनाचा उगम होतो
अशाच एका कातरवेळी
आभाळाच्या घुमटात
अनाकलनीय सूर येतो
हुरहूर लावीत वाऱ्याला
बासरीवर झंकारतो
शुभ्र मेघडंबरीवरून
कळस चढू लागतो अन
निराकार षडज हुंकारतो
...तिथेच माझ्या मनाचा उगम होतो
अशाच एका कातरवेळी
कविता खिन्न होते
पाचोळ्याच्या सावलीत
शब्दांना शोधू लागते
पापणीतल्या अंधारात
निशब्द होवून जाते
शब्दावाचून अनोळखी होते
...तिथेच माझ्या मनाचा उगम होतो
अशाच एका कातरवेळी
निराशेच कवाड उघडून
संध्याकाळ विरून जाते
पण आभाळच माझ्याशी
असणार नात तस्सच
दारापाशी ठेवून जाते
अन क्षणात ती निघून जाते
...तिथेच माझ्या मनाचा उगम होतो
-----कविता (अशीच एका कातरवेळातली )
No comments:
Post a Comment