"क्षमा केली म्हण ....."
तुझ्या माझ्यात अवचित आलेली
ही वेळच सार काही सांगते आहे
मला निघायला हव .........
आता मला थांब म्हणू नकोस
म्हणायचं असेल खरच काही
तर फक्त ...."क्षमा केली म्हण ....."
हळवे पाणी डोळ्यात आहे
तुझ्याही ....माझ्याही ......
त्याला अश्रू म्हणू नको
काही म्हणायचं असेल तर
माझा मृत्यू म्हण ........!!
तत्पूर्वी एकदा ..........
"क्षमा केली म्हण ...."
कबूल आहेत मला माझ्या चुका
उदारपणे आज तू ही कबूल कर
प्रेम केल होतंस म्हण .........!!
तत्पूर्वी एकदा ..........
"क्षमा केली म्हण ...."
उतरली आहेत दुपारची उन्हे
लांबल्या आहेत
संध्याकाळच्या सावल्या
त्या अंधारात जाण्यापूर्वी
मुक्त करू दे मला माझे प्राण
जे झाल त्याला तुझ
........नशीब समज
जे होणार नाही त्याला
माझ नशीब म्हण .......!!
सार काही नंतर म्हण
तत्पूर्वी एकदा ..........
"क्षमा केली म्हण ...."
मी निघून गेल्यावर
सुकेल तुझ्या ओठाची लाली
येईल रक्तावर
जखमांची लव्हाळी
पण तेव्हा .....जखमेला पण
खपलीच म्हण .......!!
तत्पूर्वी एकदा ..........
"क्षमा केली म्हण ...."
उतला नाही मातला नाही
तुझा घेतला वसा
मी टाकलेला नाही ...कारण ...
ही सुरवात नाही ....हा शेवट नाही
तुझ्या माझ्या जीवनाचीही
'कविता' झाली म्हण .....!!
मला निघायला हव
तुला सार विसरायला हव
तत्पूर्वी एकदाच ..........!!
"क्षमा केली म्हण ...."
----कविता
तुझ्या माझ्यात अवचित आलेली
ही वेळच सार काही सांगते आहे
मला निघायला हव .........
आता मला थांब म्हणू नकोस
म्हणायचं असेल खरच काही
तर फक्त ...."क्षमा केली म्हण ....."
हळवे पाणी डोळ्यात आहे
तुझ्याही ....माझ्याही ......
त्याला अश्रू म्हणू नको
काही म्हणायचं असेल तर
माझा मृत्यू म्हण ........!!
तत्पूर्वी एकदा ..........
"क्षमा केली म्हण ...."
कबूल आहेत मला माझ्या चुका
उदारपणे आज तू ही कबूल कर
प्रेम केल होतंस म्हण .........!!
तत्पूर्वी एकदा ..........
"क्षमा केली म्हण ...."
उतरली आहेत दुपारची उन्हे
लांबल्या आहेत
संध्याकाळच्या सावल्या
त्या अंधारात जाण्यापूर्वी
मुक्त करू दे मला माझे प्राण
जे झाल त्याला तुझ
........नशीब समज
जे होणार नाही त्याला
माझ नशीब म्हण .......!!
सार काही नंतर म्हण
तत्पूर्वी एकदा ..........
"क्षमा केली म्हण ...."
मी निघून गेल्यावर
सुकेल तुझ्या ओठाची लाली
येईल रक्तावर
जखमांची लव्हाळी
पण तेव्हा .....जखमेला पण
खपलीच म्हण .......!!
तत्पूर्वी एकदा ..........
"क्षमा केली म्हण ...."
उतला नाही मातला नाही
तुझा घेतला वसा
मी टाकलेला नाही ...कारण ...
ही सुरवात नाही ....हा शेवट नाही
तुझ्या माझ्या जीवनाचीही
'कविता' झाली म्हण .....!!
मला निघायला हव
तुला सार विसरायला हव
तत्पूर्वी एकदाच ..........!!
"क्षमा केली म्हण ...."
----कविता
No comments:
Post a Comment