Pages

Friday, 13 July 2012

आश्रित उदासीनतेचा

आश्रित उदासीनतेचा

ओसरण्या अश्रूंचा पूर डोळ्यात सांजवात
विझेल वात कि ओसरेल पूर जागवित रात

निवडुंगात रुजता सोनेरी वाळूचा जडतो छंद
वितळले मेघ जरी वाळूतच रुजायाचा मज नंद

आवडे तुम्हास भूपाळीच्या लोभस कळ्या
विराणी भाळते देवूनी संसारीच्या कळा

अक्षरातुनी क्षर क्षर शब्दांच्या अचल वेदना
कवितेस का स्फुरती निशब्दाच्या भावना

पिंपळ पानावरी उमटूनी चित्रासवे भावसंग
गीरगोट्यातुनी बोलते तेच माझे अंतरंग

कुणास का कळावे निर्जीवाचे जीव अपार
आहे आश्रित मी उदासीनतेचा त्या नभापार

----कविता

No comments:

Post a Comment