Pages

Friday, 13 July 2012

विडंबन : कांदेपोहे

विडंबन : कांदेपोहे 

अवधूत गुप्ते यांची क्षमा मागून ...

भिजलेल्या साबुला आस्तिकांची फोडणी
खिचडीसाठी आसुसलेले शेंगदाणे कुट वरी
आयुष्य हे उपवासाच्या कढईतले शाबुदाणे

भक्तांच्या त्या बाजारातून ब्रम्हवृन्दांची दाटी
यांना म्हणे तो वरचा सांगी उपहाराच्या गोष्टी
रोज खावे रोज बसावे धरून पोटोबा पोटी
उपवसादिवाशीही असे हातामध्ये ताटवाटी

दूर मंदिरातल्या पांडूरंगास आर्त स्मरताना
कुणीतरी यावे हळूच मागून वडापाव खाताना
नकळत विसरावे विठोबाला वड्यास बघताना
अन मग डोळे उघडावे बटाट्याचा खीस खाताना

भक्ती मार्गाचे धुवून शाबुदाणे कर्मकांडे केली ज्यांनी
आणि सजवली खोटी भावुकता उपासाच्या निमित्तानी
भविष्यात देवालाच उपाशी ठेवण्याचा अट्टाहास त्यांचा
भुकेल्या भक्तीच्या देवावरी शिपंडून कर्मठ पाणी ....

-----कविता

No comments:

Post a Comment