Pages

Monday, 16 July 2012

अलवार हालचाली

अलवार हालचाली 



प्रत्येक येणारया श्वासात 
तुझे नाव विरघळते आहे 
आणि पोहचते आहे 
थेट हृदयापर्येंत.......!!
होत आहेत हृदयात 
तुझ्या ओळखीच्या 
त्या अलवार हालचाली 
अन अलगदपणे 
लपेटून घेत आहेत 
माझ मन मन ......!!

रोमारोमात फक्त 
तुझे नाव भिनवून 
मी जगते आहे ....!!
एकेक क्षण 
माझ्या आयुष्यातला 
तुझ्या अस्तित्वाने 
उजळून निघणारा ......!!

किती दूर आहेस रे तू 
पण तुलाही जाणवत 
असतील ना रे ?
तुझ्या आभाळात 
वाऱ्यासोबत होणाऱ्या
चांदण्याच्या हालचाली 



---कविता

No comments:

Post a Comment