तोची एक गजानन
तो पुरुष असे अवतारी
प्रगटोनी शेगावीचे नगरी
दीन अनाथांचा कैवारी
तोची एक गजानन
पांघरुनी शेला ममतेचा
सांगे सकळा नेम भक्तीचा
करीतसे तो जप नामाचा
तोची एक गजानन
ब्रम्हांडनायक कुणी म्हणे
विठा पांडुरंग कुणी म्हणे
तो भक्ताचे हेतू सर्व जाणे
तोची एक गजानन
तो तपस्वी असे ब्रम्हज्ञानी
कालेश्वर त्रिकालदर्शनी
तरीही भक्तांच्या वसे मनी
तोची एक गजानन
ओवीचे झाले चरण संपूर्ण
त्याचे कृपेने झाले कवन
सदगुरू चरणी अर्पण
तोची एक गजानन
------कविता
No comments:
Post a Comment