असे जगावे वाटते
शून्यास छेद देत कधीतरी आपले मजला जावे वाटते
तरी न भेद करीत शून्याचा मीच शून्य व्हावे वाटते
मौनस्थ, व्रतस्थ, बंधस्थ सारे सोडवूनी निघावे वाटते
आपलेच आयुष्य त्रयस्थ म्हणुनी मला जगावे वाटते
उजेडाच्या सावलीस जमवून असे अंधारावे वाटते
झाकोळताच अंधार अस्तित्व त्याचे पांघरावे वाटते
शब्दास कंप येता लेखणीचे वळण निसटावे वाटते
स्तब्ध अक्षरातुनी मजलाच शब्दात मेळवावे वाटते
सोबतीचे धडे गिरवूनही एकटेच कधी रडावे वाटते
तरी न ढाळीत आसवे दुखास आपले म्हणावे वाटते
-------कविता

No comments:
Post a Comment