Pages

Friday, 13 July 2012

चातक

चातक

दाटलेल्या अंधारात
वीज होवून जा
माझ्या महाली येवून जा
शापित चातकाला
प्रेमाचा थेंब देवून जा

नाहीच जमले तर
तुझ्यावर उधळलेल्या
डावांवर हसून जा
बंधलेल्या शापावर
थोडेसे रडून जा

जगलो असेन तुझ्याचसाठी
उरलो आहे तुझ्याचसाठी
चुरडलेल्या पंखाना
व्यंग म्हणून
तिरस्कार तरी करून जा

नाहीच जमले तर
माझे प्राण मला देवून जा
अथवा मरणाला सोबतीस
देवून जा
पण एकदा बरसून जा

रित्या तुझ्या ओंजळीत
देयीन मी पाणी
रुक्ष तुझ्या मनास
भिजवेन क्षणोक्षणी
टिपलेत मी
माझ्या आसवांचे पाणी
ते तरी घेवून जा

नाहीच जमले तर
मला विसरून जा
विसरताना आठवशील
एकदा तेव्हा
मी येयीन तुझ्या महाली
सोबत तुझ्या आठवांना

-----कविता

No comments:

Post a Comment