Pages

Friday, 13 July 2012

बघ गरुड होवून

बघ गरुड होवून

गरुडाने चिमणीला आव्हान केले

बघ एकदा गरुड होवून
घे आज आकाश पेलून
चिमणीने आव्हान स्वीकारले
गर्वाने आकाशात पंख पसरले

पण चिमणीस उमजले ...

मोठेपणास काटेरी कुंपण
संन्यासी आहे हे आंगण
आकाशात न साज नवा
नुसत्या कक्षाच रुंदावलेल्या

सूर्य पण भ्रमात चक्रिकार
शून्याचा एक भ्रमिष्ट आकार
आकाश कसे म्हणावे याला
कान्हाचा रंगच नाही निळा

कलेचा चंद्र असा आडोशाला
कुणी लपंडाव हा रचलेला
आहेच कुठे शीतल चांदणे
इथे तर कष्टाचे शिंपणे

गरुडाचे पंख जड जड झाले
चिमणीला समजले

गरुडझेप ही असामान्य गरुडाचे आकाश
पाणातल्या आकाशाहुनी आभासी
चिमणीस मऊ गवताचे पाते आठवले
तिने आपल्या आभाळात पंख पसरले

....कविता

No comments:

Post a Comment