भेट
थबकत मन माझे थांबते आज दारी
नजर नजर माझी राहते त्या किनारी
रतन सुमन पाही सोनचाफा कळ्यांनी
नकळत लपते का? ती जुईच्या कळ्यांनी
लपुन छपुन जाता ती फुलाआड रानी
अडुन अडुन पाहे लाजऱ्या लोचनांनी
हरखून स्पर्श होता त्या फुलांचा धरेला
मृदुल मधुर राणी पाहिली त्या क्षणाला
बकुळ बकुळ राही गंध माझ्या उराशी
अन अलगद झाली भेट माझी तिच्याशी
-----कविता
थबकत मन माझे थांबते आज दारी
नजर नजर माझी राहते त्या किनारी
रतन सुमन पाही सोनचाफा कळ्यांनी
नकळत लपते का? ती जुईच्या कळ्यांनी
लपुन छपुन जाता ती फुलाआड रानी
अडुन अडुन पाहे लाजऱ्या लोचनांनी
हरखून स्पर्श होता त्या फुलांचा धरेला
मृदुल मधुर राणी पाहिली त्या क्षणाला
बकुळ बकुळ राही गंध माझ्या उराशी
अन अलगद झाली भेट माझी तिच्याशी
-----कविता
No comments:
Post a Comment