पाठवणी
लेवुनी चुडा हिरवा
माहेरचा द्या गारवा
देत प्रीतीचा गोडवा
करा ग पाठवणी
शकुनाच्या मेहंदीने
सोनसळ्या हळदीने
अक्षतांच्या सरीने
करा ग पाठवणी
घाला मंडप दारी
मिरवा बाशिंग वरी
नटवूनी ग नवरी
करा ग पाठवणी
जाताच सई अंगणी
आलेची डोळ्यात पाणी
जावूनी पाठराखणी
करा ग पाठवणी
जाता नव्या माणसात
आम्हा ठेव आठवात
ये पुन्हाशी माहेरात
होता ग पाठवणी
----कविता
लेवुनी चुडा हिरवा
माहेरचा द्या गारवा
देत प्रीतीचा गोडवा
करा ग पाठवणी
शकुनाच्या मेहंदीने
सोनसळ्या हळदीने
अक्षतांच्या सरीने
करा ग पाठवणी
घाला मंडप दारी
मिरवा बाशिंग वरी
नटवूनी ग नवरी
करा ग पाठवणी
जाताच सई अंगणी
आलेची डोळ्यात पाणी
जावूनी पाठराखणी
करा ग पाठवणी
जाता नव्या माणसात
आम्हा ठेव आठवात
ये पुन्हाशी माहेरात
होता ग पाठवणी
----कविता
No comments:
Post a Comment