Pages

Monday, 16 July 2012

कविता हरली

कविता हरली 

कोसळून गेली 
मनाच्या कोपऱ्यात 
आघात करून 
चर खणून गेली 
विशेषणांची करून झोळी 
अनाम कर्त्याची 
तिने दानत मागितली 


अन .....
फाटक्या पदरात 
बंबाळलेले शब्द घेवून 
निघून गेली 
तिच्या पाठमोऱ्या 
आकृतीबंधात ...
माझी व्यथा 
तिच्या छायेतून 
आरपार निघून गेली 


जीत माझी होती 
अन हारही माझीच 
पण ....
ती तरली होती 
फसली होती 
रडली होती 


अन अखेर 
आज हरली होती 
माझी कविता हरली होती 
हरली कविता हरली होती 


-----कविता

No comments:

Post a Comment