Pages

Wednesday, 1 October 2014

पूर्ण कुमारिका

पूर्ण कुमारिका



बहर ओसरत नाही 
झिरपतो सखोल
अदृश्य होत जातो 
शुभ्र तारांगणात 

आकाश मंद होते 
क्षितीजाच्या मेण्यात 
अधांतरी काळोख 
मातीच्या अंगणात 

माया थांबत नाही 
ब्रम्ह बदलत नाही
एक गाव ओलांडून 
लमाण्या दुजा गावात  

फुलत नाही निखारा 
तेवत राहते समई
पसरते विश्व अथांग 
एका पुर्ण दवबिंदुतले

निद्रिस्थ होतो शंकर
योगमुद्रेच्या ध्यानात
पूर्ण कुमारिका पाहते 
पुर्त वचनाची वाट


----कविता 

No comments:

Post a Comment